पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा जाहीर कार्यक्रम झाला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीचे अंतिम जागावाटप अद्याप झालेले नाही. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार आपला प्रचार करताना दिसतात. तर अनेकांकडून विरोधात असणाऱ्या नेता किंवा उमेदवारांच्या खोट्या बातम्या किंवा प्रतिमा मलिन करण्याचा देखील प्रयत्न केला जातो. त्यातच आता काँग्रेसचे बडे नेते आणि माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे आणि त्यांचे चिरंजीव माजी नगरसेवक अविनाश बागवे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. या बातमीत तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण आता रमेश बागवे यांनी दिले आहे.
‘मी भाजपच्या वाटेवर अशा बातम्या पसरवून माझ्या नावाची बदनामी सुरु आहे. आयुष्यात हा विचार माझ्या स्वप्नातही येणार नाही. मी काँग्रेसचाच असून ४० वर्षे काँग्रेसची सेवा करत आहे. मी, माझा समाज आणि माझं कुटुंब काँग्रेसला मानणारा आहे. आम्ही संविधानवादी आहोत. आम्ही मनुवादी विचाराच्या विरोधी काम करणारी माणसं आहोत. भाजप आमच्या स्वप्नातही येणार नाही. मरेपर्यंत काँग्रेसचेच राहणार’, असे रमेश बागवे म्हणाले आहेत.
‘ज्यांनी कोणी माझी बदनामी करण्याचा प्रयत्न केला त्यांना योग्यवेळी चपराक बसवणार आहे. या निवडणुकीत दिसेल सर्वांना बागवेंचे कार्यकर्ते आणि कुटुंब हे काँग्रेसचे आहे आणि काँग्रेसचेच राहणार’, असेही रमेश बागवेंनी ठणकावून सांगितले आहे. त्यामुळे बागवेंबाबत खोट्या बातम्या कोण पसरवत आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांची सर्जिकल स्ट्राईक; उमेदवार यादीपूर्वीच वाटले एबी फॉर्मस्, पुण्यातून कोणाला संंधी?
-Assembly Election: अजितदादांचं ठरलं! येत्या २८ तारखेला कन्हेरीत फुटणार प्रचाराचा नारळ
-भाजपच्या पहिल्या यादीत नाव नाही; बाळा भेगडे, भीमराव तापकीर ‘सागर’ बंगल्यावर
-वडगाव शेरी भाजपकडे जाणार? सुनील टिंगरेंची धाकधूक वाढली, देवगिरीवर घेतली अजितदादांची भेट
-उमेदवारी जाहीर होताच महेश लांडगेंनी २ माजी महापौरांसोबत ठोकला शड्डू