पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर महायुतीकडून भाजपच्या पहिल्या ९९ उमेदवारांची यादी जाहीर झाली. यामध्ये पुण्यातील कोथरुडमधून चंद्रकांत पाटली, शिवाजीनगरमधून सिद्धार्थ शिरोळे आणि पर्वतीमधून माधुरी मिसाळ यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. भाजपकडून तिन्ही विद्यमान आमदारांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेकडून अद्याप यादी जाहीर झाली नसून विद्यमान आमदारांनाच उमेदवारी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. यावरुन महायुतीतील इच्छुक बंडखेरी करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आजच राष्ट्रवादी, शिंदे सेनेकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. अशातच पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिंदेचे सैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर उमेदवारी मिळण्याच्या मागणीसाठी पायी निघाले आहेत.
मतदारसंघ हा शिवसेनेसाठी सोडावा आणि नाना भानगिरे यांना हडपसरमधून उमेदवारी दिली जावी, या मागणीसाठी हजारो शिवसैनिक आणि नागरिकांनी प्रभू श्रीराम यांच्या चरणी प्रार्थना आणि महाआरती केली. या माध्यमांतून नाना भानगिरे यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन देखील केले. त्यानंतर मतदारसंघातील शिवसैनिक आक्रमक झाले असून हडपसर ते मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर पायी चालत निघाले आहेत.
हडपसरचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चेतन तुपे हे आमदार असून त्यांनाच पुन्हा उमेदवारी देणार असल्याचे बोलले जात आहे. त्यातच हडपसरमधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू सहकारी आणि शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे हे देखील इच्छुक आहेत. या दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यायची हा पेच महायुतीमधील नेत्यासमोर निर्माण झाला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-नागरिकांना प्रलोभन अन् आमदारांना दिवाळी किट वाटपाची घाई; धंगेकरांवर गुन्हा दाखल
-Assembly Election: काँग्रेस भवनात आघाडीच्या नेत्यांची बैठक; प्रशांत जगताप म्हणाले, ‘निष्ठावंतांना…’
-आजवर साथ दिली आता उमेदवारी द्या, कसब्यात मुस्लिम समाज आग्रही; थेट घेतली प्रभारींची भेट
-राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षपदी पहिल्यांदाच मराठी चेहरा; विजया रहाटकर यांची नियुक्ती
-Assembly Election: खडकवासल्याच्या राजकारणात नवी खेळी; अजितदादांच्या शिलेदाराने थोपटले दंड