पुणे : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला असून राजकीय पक्षांची जागावाटप आणि उमेदवार निश्चितीसाठी बैठका, भेटीगाठी सुरु आहेत. अशातच पुण्यातील चिंचवड मतदारसंघात महायुतीकडून महाविकास आघाडीकडून उमेदवार निश्चित झालेला नाही. महायुतीकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे मतदारसंघ असण्याची शक्यता वर्तवली जात होती. ऐनवेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याने महाविकास आघाडीत हा मतदारसंघ शिवसेनेकडे जाण्याची शक्यता आहे.
अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवडचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे ह्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांनी मनगटावर शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले. ह्यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, उपनेते… pic.twitter.com/ng5mXUwM2h
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 18, 2024
महायुतीत चिंचवडमध्ये भाजपचे विद्यमान आमदार अश्विनी जगताप आहेत. आणि ‘ज्या पक्षाचा विद्यमान आमदार त्या पक्षाला ती जागा’ या सुत्रामुळे ही जागा भाजपकडे असणार आहे. चिंचवड मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छूक असणारे मोरेश्वर भोंडवे यांनी राष्ट्रवादीतून एक्झिट केली. निवडणूक लढण्यासाठी मोरेश्वर भोंडवेंनी शिवसेनेत प्रवेश केल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भोंडवेंच्या पक्षप्रवेशामुळे चिंचवड मतदारसंघ हा ठाकरे गटाकडे असल्याचे निश्चित मानले जात आहे.
मोरेश्वर भोंडवे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन वेळा नगरसेवक होते. तसेच राष्ट्रवादी (अजित पवार गट) शहर कार्याध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. मोरेश्वर भोंडवे यांनी २०१४ मध्ये अपक्ष म्हणून चिंचवड विधानसभेची निवडणूक लढवली होती. यंदा देखील त्यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली असून ज्येष्ठ नेते शरद पवारांची भेटही घेतली होती.
महत्वाच्या बातम्या-
-कसब्यात काँग्रेसमध्ये बंडाचा झेंडा, महिला नेत्याचा लढण्याचा नारा; धंगेकरांना डोकेदुखी
-भाजपच्या नेत्यांवर होणार निलंबनाची कारवाई! मावळमध्ये काय राजकीय राडा?
-राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यालयीन तत्परतेने १२० विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा!
-Assembly Election: जगताप कुटुंबातील वाद मिटला; अखेर चिंचवडचा उमेदवार ठरला?
-मावळात राजकारण पेटलं! ‘आमच्यात फूट पाडणाऱ्यांचा…’ सुनील शेळकेंनी दिला इशारा