पुणे :विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर महायुती आणि महविकास आघडीतील पक्षांची जागा वाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षांमधील उमेदवारांची निश्चिती देखील झाली असून लवकरच उमेदवार याद्या जाहीर होऊ शकतात. पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या मावळ मतदारसंघामध्ये काही भाजप नेत्यांकडून विरोधी महाविकास आघाडीला मदत करण्याची भूमिका घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यामुळे राज्यातील भाजप पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मावळ भाजपचे नेते हे तालुक्यामध्ये सभा, मिटींग, बैठकीत प्रत्येक ठिकाणी भाषण करताना मावळ भाजपमधील कार्यकर्ता हा कसा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे, याची उदाहरणे देत असतात. मावळ भाजपचा कार्यकर्ता हा पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे, अशी अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला भेटतात. परंतु हेच नेते आता स्वतःच्या स्वार्थासाठी भाजपला इतरांच्या दावणीला बांधताना दिसत आहेत.
भाजपमधील ज्येष्ठ नेते हे भाजपतील कार्यकर्त्यांचा कोणताही विचार न घेता, पक्षाचे होणारे नुकसान न पाहता वैयक्तिक स्वार्थाचे निर्णय घेत असल्याची कुजबुज मतदारसंघात होत आहे. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला कितीही नुकसान झाले तरी चालेल, पार्टीचा राज्यामध्ये मुख्यमंत्री नाही झाला तरी चालेल, पार्टीला राज्यात घवघवीत यश आलं नाही तरी चालेल, परंतु मावळ तालुक्यातील नेत्यांची पोळी भाजली पाहिजे, याकडेच त्यांचं लक्ष लागलेलं आपल्याची चर्चा आता नागरिकांमध्ये रंगू लागली आहे, त्यामुळे भाजपचे राज्यातील नेते मावळात युती धर्माला हरताळ फसायला निघालेल्या नेत्यांवर कारवाई करणार का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-राज्यमंत्री मुरलीधर मोहोळांच्या कार्यालयीन तत्परतेने १२० विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा!
-Assembly Election: जगताप कुटुंबातील वाद मिटला; अखेर चिंचवडचा उमेदवार ठरला?
-मावळात राजकारण पेटलं! ‘आमच्यात फूट पाडणाऱ्यांचा…’ सुनील शेळकेंनी दिला इशारा
-अजित पवारांच्या भेटीनंतर मानकरांची नाराजी दूर; म्हणाले, ‘एकी ठेऊन आता विधानसभेला…’
-जगदीश मुळीकांनी घेतली बानकुळेंची भेट; वडगाव शेरी भाजपकडे घेण्याबाबत चर्चा?