पुणे : विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं अन् राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला. त्यातच मावळ विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीत मोठा वाद पहायला मिळाला आहे. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटातील बापू भेगडे यांनी मावळ विधानसभा लढण्यावर ठाम असल्याचे म्हटले होते. त्यावर आता विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी आज माध्यमांशी बोलताना गंभीर आरोप केला आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत फूट कशी पडेल आणि अजित पवारांसोबत असलेले कार्यकर्ते कसे बाजूला जातील यासाठी काहीजण प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. हा आरोप करताना आमदार शेळके यांनी कोणत्याही नेत्याचं नाव घेतलं नाही. त्यामुळे त्यांचा रोख नेमका कोणाकडे? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
“इच्छुक राहणं हे गैर नाही. हा संविधानाने प्रत्येकाला अधिकार दिला आहे. परंतु, पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेईल त्या निर्णयाचे स्वागत करायला हवं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत कशी फूट पडेल?,अजित पवारांच्या सोबत असलेले कार्यकर्ते कसे बाजूला जातील. यासाठी काहीजण प्रयत्न करत आहेत. तो प्रयत्न हाणून पाडू. आमच्या पक्षातील एकमेकांच्या विरोधात उभं राहिल्यास कुणी- कुणी फूट पाडण्याचा प्रयत्न केला. त्यांची नाव व्यासपीठावर जाहीर करणार. इच्छुकांना उमेदवारी न मिळाल्यास एकसंघ राहण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत”, असेही सुनील शेळके म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवारांच्या भेटीनंतर मानकरांची नाराजी दूर; म्हणाले, ‘एकी ठेऊन आता विधानसभेला…’
-जगदीश मुळीकांनी घेतली बानकुळेंची भेट; वडगाव शेरी भाजपकडे घेण्याबाबत चर्चा?
-कसब्याचा फैसला बावनकुळेंनी एका शब्दात संपवला; ‘उमेदवार जातीवर नाही तर त्याच्या कर्तृत्वावर…’
-अजितदादांच्या राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरूच; आधी ६०० अन् आता किती पदाधिकाऱ्यांचे धडाधड राजीनामे?
-‘अजितदादा मिटकरींना आवर घाला अन्यथा…’; भाजपच्या इशाऱ्याने बारामतीत दादांची डोकेदुखी वाढली