पुणे : राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाल्या आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीनाट्य सुरु झाले. पुणे शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा घेण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. दीपक मानकर यांच्या राजीनाम्यापूर्वी शहरातील तब्बल ८५० पेक्षा जास्त नाराज पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आज मानकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवारांची भेट घेतली आहे. अजित पवारांच्या भेटीनंतर मानकरांची नाराजी दूर झाल्याचे पहायला मिळाले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सांभाळत असताना मी माझ्या संघटनेच्या मजबुतीकरणासाठी विधान परिषदेच्या जागेची मागणी केली होती. माझ्यावर विश्वास ठेऊन पुणे शहरातील ८५० पेक्षा जास्त पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी सामूहिक राजीनामे दिले आणि माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. गेल्या काही दिवसात आपल्या पक्षात घडलेल्या घटनांची योग्य दखल घेऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज, शुक्रवार सकाळी प्रदेश कार्यालय, मुंबईत भेट घेऊन शहराध्यक्ष या नात्याने पुणे शहरातील परिस्थितीचा आढावा घेतला. अजित पवार हे पुणे शहर कार्यकारणीच्या कार्यावर अत्यंत समाधानी आहेत. त्यांचे पुण्यातील कार्यकर्त्यांवर विशेष प्रेम असून कोणत्याही पदाधिकाऱ्याचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही, असे अजित पवारांनी ठामपणे जाहीर केले आहे.
शहरातील सर्वच कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन आपण तयार केलेले संघटन कौतुकास्पद असून त्यांच्या बळकटीसाठी आणि पक्षवाढीसाठी उपयोगी होणाऱ्या विधानपरिषदेसाठी आपण मागणी केली होती. परंतू काही कारणास्तव ती मागणी पूर्ण करता आली नाही. परंतू येत्या काळात आपल्याला योग्य वेळी योग्य न्याय दिला जाईल, अशी ग्वाही अजित पवारांनी यावेळी दिली. शहरातील सर्वच कार्यकर्त्यांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या कामाची प्रशंसा करत दादांनी या कार्याची योग्य पोचपावती लवकरच दिली जाईल, असा ठाम विश्वास अजित पवारांनी मानकरांना दिला आहे.
पुणे शहर आपला बालेकिल्ला असून कोणत्याही कार्यकर्त्यांनी नाराज न होता येत्या विधानसभेत महायुतीचे जोमाने काम करून आपल्या पक्षाची ताकद दाखवून देऊया. मी आपल्या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे, असा शब्द अजित पवारांनी दिला आहे. तरी आमची एकी अशीच ठेऊन आम्ही येत्या विधानसभेला जोमाने सामोरे जाणार आहोत, असे दीपक मानकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-जगदीश मुळीकांनी घेतली बानकुळेंची भेट; वडगाव शेरी भाजपकडे घेण्याबाबत चर्चा?
-कसब्याचा फैसला बावनकुळेंनी एका शब्दात संपवला; ‘उमेदवार जातीवर नाही तर त्याच्या कर्तृत्वावर…’
-अजितदादांच्या राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरूच; आधी ६०० अन् आता किती पदाधिकाऱ्यांचे धडाधड राजीनामे?
-‘अजितदादा मिटकरींना आवर घाला अन्यथा…’; भाजपच्या इशाऱ्याने बारामतीत दादांची डोकेदुखी वाढली
-तिसऱ्या आघाडीचं १५० जागांबाबत ठरलं! शिंदे-फडणवीस अन् ठाकरे-पवारांसोबत भिडणार