पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुणे भाजपमध्ये जातीय कार्ड खेळत दबावतंत्र वापरल्याचे पहायला मिळाले. कसबा विधानसभा मतदारसंघातून माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये आता कसब्यातून ब्राह्मण समाजातील नेत्याला उमेदवारी देण्याची मागणी करणारे पत्र काही संघटनांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहे. यावर आज पुण्यात पत्रकारांशी बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
समाज बघून पक्ष कधीच निर्णय करत नाही. उमेदवार जातीवर नाही तर कर्तुत्वावर ठरणार. कोणताही उमेदवार जातीच्या आधारावर ठरत नसतो, तर त्याच्या कार्यक्षमतेवर लोकप्रियतेवर ठरवला जातो. जात, धर्म पंथापेक्षा उमेदवाराची विश्वासार्हता महत्त्वाची आहे. आमचे जेवढे उमेदवार आहेत ते जनतेला आणि कार्यकर्त्यांना काय वाटतं, त्यांचं मत काय आहे, यांच्यावर ठरवला जातो. उमेदवाराची स्वतःची क्षमता किती आहे, हे देखील महत्त्वाचे आहे. समाज म्हणून कोणताही निर्णय करण्यापेक्षा उमेदवाराच्या कर्तुत्वावर निर्णय करू, असे म्हणत चंद्रशेखर बावनकुळेंकडून जातीच्या आधारावर उमेदवार दिला जाणार नसल्याचं स्पष्ट सांगितले आहे.
दरम्यान, कसबा मतदारसंघातून इच्छुक असणाऱ्या उमेदवारांमध्ये धीरज घाटे, कुणाल टिळक आणि स्वरदा बापट हे ब्राह्मण समाजातून तर हेमंत रासने हे कासार समाजातील आहेत. या मतदारसंघात ब्राह्मण मतदारसंख्या मोठी असून कसब्यातून ब्राह्मण उमेदवार द्यावा, अशी मागणी करणारे एक पत्र व्हायरल होत होते. यामुळे अप्रत्यक्षपणे हेमंत रासनेंचा पत्ता कट करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे दिसत होते. मात्र, याबाबत आता खुद्द प्रदेशाध्यक्षांनी प्रतिक्रिया देत जातीवरुन उमेदवारी ठरणार नसल्याचे स्पष्ट सांगितले आहे. त्यामुळे आता हेमंत रासने यांचा पत्ता कट होण्याची धाकधूक संपली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजितदादांच्या राष्ट्रवादीत राजीनामा सत्र सुरूच; आधी ६०० अन् आता किती पदाधिकाऱ्यांचे धडाधड राजीनामे?
-‘अजितदादा मिटकरींना आवर घाला अन्यथा…’; भाजपच्या इशाऱ्याने बारामतीत दादांची डोकेदुखी वाढली
-तिसऱ्या आघाडीचं १५० जागांबाबत ठरलं! शिंदे-फडणवीस अन् ठाकरे-पवारांसोबत भिडणार
-“मला विधिमंडळात जायचंय महामंडळात नाही”, श्रीनाथ भिमालेंचा पर्वतीत लढण्याचा निर्धार कायम
-“भोसरीच्या मातीत समोरच्याला उचलून टाकणारे पैलवान जन्माला येतात, चावणारे नाही” -महेश लांडगे