पुणे : पुणे जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती मंगलदास बांदल यांच्यासह हनुमंत खेमदारे आणि सतीश यादव यांची मालमत्ता ईडीने (Enforcement Directorate) जप्त केली आहे. शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने बांदल यांच्यावर कारवाई केली आहे. पुणे, सोलापूर आणि अहमदनगरमधील ८५ कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली आहे.
मंगलदास बांदल (Mangaldas Bandal) यांच्यावर कर्ज घेऊन फसवणूक केल्याचा आरोपावरुन ही कारवाई करण्यात आली आहे. या आधी याच गुन्ह्यामध्ये अनिल भोसले यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता. तसेच आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे. या गुन्ह्यात ईडीने बांदल यांच्या करावाई करत घरातून ईडीने अनेक कागदपत्रे आणि ८५ कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. मंगलदास बांदल यांच्यासह हनुमंत खेमदारे आणि सतीश यादव यांची यांची मालमत्ता देखील ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असणारे मंगलदास बांदल यांच्या बँक खात्यांची माहिती ईडीच्या अधिकाऱ्यांनी घेतली. त्यांच्याविरुद्ध पुणे पोलिसांनी एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला धमकावल्याप्रकरणी मोक्का अंतर्गत कारवाई केली होती. मनी लॉड्रिंग प्रकरणी त्यांच्या शिक्रापूर आणि महंमदवाडीतील निवासस्थानी ईडीने २१ ऑगस्ट रोजी छापे टाकले होते. त्यावेळी त्यांना अटक केली होती. बांदल यांच्याविरुद्ध शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे आता मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-कसब्यात इच्छुकांकडून ब्राह्मण कार्डची खेळी, भाजप बहुजन उमेदवार डावलणार का? राज्यात वातावरण तापणार
-खडकवासल्यात राजकीय राडा; महायुतीच्या सेना-भाजपचे इच्छुक आमने-सामने, अन् पुढे काय घडलं?
-चाकणकरांना पुन्हा मिळालं महिला आयोगाचं अध्यक्षपद; दादांच्या राष्ट्रवादीत वादाच ठिणगी
-Assembly Election: अखेर जानकरांनी दोर तोडले; भाजपला रामराम करत महायुतीतून एक्झिट
-‘तुमच्याच घरामध्ये पद वाटणार असाल तर…’ विधान परिषदेला डावलल्याने दीपक मानकर आक्रमक