पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. महायुतीचं अंतिम जागावाटप अद्याप झालेले नाही. अशातच पुणे शहरातील खडकवासला मतदारसंघात उमेदवारीवरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेना आणि भाजपचे इच्छुक चांगलेच भिडल्याचे पहायला मिळाले आहे. खडकवासल्यामध्ये विद्यमान आमदार भीमराव तापकीर (Bhimrao Tapkir) हे भाजपचे असल्याने ही जागा भाजपकडे राहण्याची शक्यता असतानाच शिंदेसेनेने या जागेवर दावा केला आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रमेश कोंडे हे या मतदारसंघातून निवडणूल लढण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार तापकीर यांना पक्षांतर्गत विरोध आणि शिवसेना शिंदे गटाकडून केलेला दाव्यामुळे तापकीरांची मोठी कोंडी झाली आहे. एका कार्यक्रमानिमित्त रमेश कोंडे आणि भीमराव तापकीर हे दोन्ही नेते आज आमने-सामने आल्याचा पाहायला मिळाले.
रमेश कोंडे काय म्हणाले?
“शिंदे साहेबांचा आदेश आल्यानंतर खडकवासला विधानसभा आम्ही लढवणार आहोत. पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यामध्ये कोयत्यांना धार लावायला सांगितले आहे. तर जरांगे पाटील यांनी तलवारींना धार लावायला सांगितले आहे. आम्हाला ही तसेच आदेश असून युद्ध चालू होणार आहे. म्हणून आमच्या तलवारी आम्ही आधीच घासून ठेवल्या आहेत. शिंदेसाहेब ही जागा आपल्याकडे घेतील अशी अपेक्षा असून मला लढायचा आदेश देतील”, असा विश्वास रमेश कोंडे यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
भीमराव तापकीर काय म्हणाले?
“लोकशाहीमध्ये उमेदवारी मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. भाजपच्या अनेक जणांनी देखील उमेदवारी मागितली आहे. त्यामध्ये काही वावगं नाही. उमेदवारीबाबत पक्षाची कोअर कमिटी निर्णय घेईल आणि ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. खडकवासला मतदारसंघातून मी फिक्स उमेदवार आहे. मात्र, पक्ष जेव्हा नाव जाहीर करेल तेव्हा डबल फिक्स उमेदवार होईल”, असा आत्मविश्वास तापकीरांनी व्यक्त केला आहे. आता येत्या काही दिवसांत महायुतीचं अंतिम जागावाटप होईल तेव्हा उमेदवारीचा नारळ कोणत्या पक्षाच्या पदरी पडतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-चाकणकरांना पुन्हा मिळालं महिला आयोगाचं अध्यक्षपद; दादांच्या राष्ट्रवादीत वादाच ठिणगी
-Assembly Election: अखेर जानकरांनी दोर तोडले; भाजपला रामराम करत महायुतीतून एक्झिट
-‘तुमच्याच घरामध्ये पद वाटणार असाल तर…’ विधान परिषदेला डावलल्याने दीपक मानकर आक्रमक
-आचारसंहिता लागू झाली तरीही पुण्यात राजकीय पोस्टरबाजी कायम; कारवाईस टाळाटाळ
-आमदारकी हुकली पण, पुन्हा एकदा महिला आयोगाचं अध्यक्षपद; चाकणकरांना लागली लॉटरी