पुणे : विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ आमदारांपैकी ७ आमदारांचा शपथविधी पार पडला. त्यातच महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा कार्यकाळ संपण्याआधीच त्यांना पुन्हा एकदा महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. या आमदारकी आणि अध्यक्षपदाच्या निवडीवरुन महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे.
यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकरांसह (Deepak Mankar) तब्बल ६०० पदाधिकाऱ्यांनी धडाधड राजीनामे दिले आहेत. त्यातच जी तत्परता रूपाली चाकणकरांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यासाठी दाखवली हीच तात्परता आमच्याबाबत का नाही? असा सवाल मानकरांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना देखील विचारला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यात रूपाली ठोंबरे पाटील (Rupali Thombre Patil) यांनी देखील रूपाली चाकणकर यांच्या निवडीवरून नाराजी व्यक्त केली आहे.
“अध्यक्ष निवडीपूर्वी दीपक मानकर, मी आणि अनेक पदाधिकारी यासाठी इच्छुक होतो. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडे ‘आम्ही एक व्यक्ती एक पद’ यानुसार ही मागणी केली होती. मात्र चाकणकरांची महिला आयोगाच्या अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. माझी पक्षाच्या वरिष्ठांना एवढीच मागणी आहे की, ‘एक व्यक्ती एक पद’नुसार इतर महिलांना आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, ही मागणी अजितदादा पूर्ण करतील. कारण दादा काम करणाऱ्या भगिनींना कुठेच मागे ठेवत नाहीत. असा आम्हाला विश्वास आहे”, असे रूपाली ठोंबरे पाटील म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Assembly Election: अखेर जानकरांनी दोर तोडले; भाजपला रामराम करत महायुतीतून एक्झिट
-‘तुमच्याच घरामध्ये पद वाटणार असाल तर…’ विधान परिषदेला डावलल्याने दीपक मानकर आक्रमक
-आचारसंहिता लागू झाली तरीही पुण्यात राजकीय पोस्टरबाजी कायम; कारवाईस टाळाटाळ
-आमदारकी हुकली पण, पुन्हा एकदा महिला आयोगाचं अध्यक्षपद; चाकणकरांना लागली लॉटरी
-Chinchwad: जगताप कुटुंबाला स्वकियांकडूनच विरोध; विरोधी उमेदवार होणार फायदा?