चिंचवड : विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले अन् महाराष्ट्र आणि झारखंड राज्यात निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्यात सर्व मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी नेते आणि इच्छुक जोमाने तयारीला लागले आहे. त्यातच चिंचवड विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार अश्विनी जगताप या भाजपच्या असल्याने या मतदारसंघातून भाजपमधीलच नेत्याला उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, भाजपमधूनच जगताप कुटुंबाविरोधात एकवटल्याचे चित्र पहायला मिळाले आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप किंवा आमदार अश्विनी जगताप यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात असताना भाजपमधूनच त्यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध होत आहे. माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे आणि चंद्रकांत नखाते एकवटले आहेत. नखाते आणि काटे यांनी एकत्र येत माजी नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीला काही नगरसेवक उपस्थित होते.
‘जगताप कुटुंबातील व्यक्तींना सोडून आमच्यापैकी कुणालाही उमेदवारी द्यावी तरच आम्ही पक्षाचे काम करू’, असा ठराव या बैठकीत करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीला चिंचवड विधानसभा मतदारसंघातील अनेक माजी नगरसेवक उपस्थित होते. स्वकीयांकडूनच जगताप कुटुंबाला होणाऱ्या विरोधाचा फायदा विरोधी पक्षाच्या उमेदवाराला होऊ शकतो. त्यामुळे यावर आता विरिष्ठ पातळीवर याचा काय निर्णय घेतला जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘महाविकास आघाडीची २१८ जागांवर एकवाक्यता’ पण हडपसरचं काय? अमोल कोल्हे म्हणाले…
-Assembly Election: विधानसभा बिगुल वाजलं; महाराष्ट्र निवडणुकीच्या तारखा जाहीर, मतदान कधी?
-दीपक मानकरांना डावललं अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पडली वादाची ठिणगी
-‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही…’ कसब्यात रासनेंच्या समर्थनार्थ पोस्टर