पुणे : अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर आज महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. आज झालेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्रात येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान आणि २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी असा विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी महाविकास आघाडीचे राज्यातील तब्बर २१८ जागांवर एकवाक्यता झाल्याचे सांगितले आहे.
राज्यात महाविकास आघाडीतील मित्रपक्षांची २१८ जागांवर एकवाक्यता झाली असली तरीही अनेक जागांवर अद्याप तिढा कायम आहे. त्यातच पुण्यातील हडपसरच्या जागेवर महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा वाद सुरु आहे. हडपसर मतदारसंघावर आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या इच्छुकांनी दावा केला आहे. यावरही अमोल कोल्हे यांनी भाष्य केले आहे.
‘दावा कुणीही करू शकतो. सगळे पक्ष तयारी करत असतात यात, गैर नाही. प्रत्येक राजकीय पक्षाची रणनीती आहे. सगळे नेते एकत्र येत निर्णय घेतील. एकून ६५ मतदारसंघात आम्ही फिरलो आहोत. यात्रेच्या माध्यमांतून लोकांनी ठरवलं आहे की, महायुतीला घालवून महविकास आघाडीचं सरकार आणायचं आहे. लोक आमच्याकडे येतात ही तर साहेबांची जादू आहे. तिथल्या नेत्यांना सगळं महिती असतं, लोकांनी ठरवून ठेवलं आहे’, असे अमोल कोल्हे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-Assembly Election: विधानसभा बिगुल वाजलं; महाराष्ट्र निवडणुकीच्या तारखा जाहीर, मतदान कधी?
-दीपक मानकरांना डावललं अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पडली वादाची ठिणगी
-‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही…’ कसब्यात रासनेंच्या समर्थनार्थ पोस्टर
-“दोन पिढ्यांपासून त्या फक्त कोयता घासायला लावतायत”, बजरंग बाप्पाचा पंकजा मुंडेंवर पलटवार