दिल्ली | पुणे : राज्यातील बदलेल्या राजकीय समीकरणामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घड्याळ हे निवडणूक चिन्ह घेतलं तर निवडणूक आयोगाकडून ज्येष्ठ नेते खासदार शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला तुतारी हे चिन्ह देण्यात आले. देशात लोकसभा निवडणुका पार पडल्या. यावेळी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अनपेक्षित असे यश मिळाले मात्र, शरद पवारांच्या निवडणूक चिन्हाप्रमाणेच आणखी एक चिन्ह असणारे उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. याचा फटका मतदानाच्या संख्येवर झाल्याचा आरोप शरद पवार पक्षाकडून करण्यात आला.
यावरुन शरद पवारांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याबाबत तक्रार करत अपक्षाचे ‘तुतारी’ चिन्ह रद्द करण्याची विनंती केली होती. लोकसभा निवडणुकीमध्ये तुतारी चिन्ह आणि शरद पवारांच्या पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस असे चिन्ह असल्याने बहुतांश मतदारांचा गोंधळ उडाला होता. त्यामुळे याचा परिणाम मताधिक्यावर झाल्याचा आरोप शरद पवारांनी केला होता.
आता विधानसभा निवडणुकीतही शरद पवारांना याचा सामना करावा लागणार का? याबाबत बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, ‘शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने २ मागण्या केल्या होत्या. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह लहान आहे ते मोठं करण्याची पहिली मागणी त्यांनी केली होती. दुसरी मागणी त्यांनी ट्रम्पेट फ्रीज करण्याची केली होती. पहिली मागणी आम्ही मान्य केली आहे. आम्ही त्यांना लिखित स्वरूपात विचारल होत की तुमचं चिन्ह कस असाव ते सांगा. त्यांनी दिलेल्या आकारातील पाहिला आकार आम्ही मान्य केला आहे. तुतारी हे चिन्ह पूर्ण वेगळं आहे… त्याला आम्ही हात लावला नाही.’
महत्वाच्या बातम्या-
-Assembly Election: विधानसभा बिगुल वाजलं; महाराष्ट्र निवडणुकीच्या तारखा जाहीर, मतदान कधी?
-दीपक मानकरांना डावललं अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पडली वादाची ठिणगी
-‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही…’ कसब्यात रासनेंच्या समर्थनार्थ पोस्टर
-“दोन पिढ्यांपासून त्या फक्त कोयता घासायला लावतायत”, बजरंग बाप्पाचा पंकजा मुंडेंवर पलटवार