दिल्ली | पुणे : केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु असून, या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. आजच्या या पत्रकार परिषदेकडे सर्वांच्या नजरा होत्या. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार निवडणुकीविषयी माहिती देत असून २६ नोव्हेंबरआधी निवडणूक प्रकिया पूर्ण करणे निवडणूक आयोगासाठी बंधनकारक असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्तांनी सांगितले आहे.
महाराष्ट्रात एका टप्प्यात मतदान प्रक्रिया होणार असून
२२ ऑक्टोबर रोजी अर्ज भरण्याची तारीख
२९ ऑक्टोबर अर्ज मागे घेण्याची तारीख
३० ऑक्टोबर अर्ज छाणणी
४ नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याची तारीख
२० नोव्हेंबर रोजी मतदानाची तारीख
२३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.
महाराष्ट्रातील एकूण ९.६३ कोटी मतदार असून राज्यात एकूण १ लाख १८६ मतदान केंद्र असणार आहेत. पुर्णपणे महिलांनी संचालित बुथ असणार आहेत. यातील २३४ जागा या सर्वधाराणपणे उमेदवारांसाठी तर एसटी प्रवर्गासाठी २५ तर २९ जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव आहेत. महाराष्ट्राच्या विधानसभेचा काळ २६ नोव्हेंबर रोजी संपत आहेत. महाराष्ट्रात ४ कोटी ६० लाख महिला तर ४ कोटी ९३ लाख पुरुष मतदार आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले आहे.
मतदान केंद्रावर जाऊ न शकणाऱ्या नागरिकांसाठी घरुन मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्ण पणे पारदर्शकता बाळगण्यात येईल. मतदान केंद्रावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही राजीव कुमार यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दीपक मानकरांना डावललं अन् अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पडली वादाची ठिणगी
-‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही…’ कसब्यात रासनेंच्या समर्थनार्थ पोस्टर
-“दोन पिढ्यांपासून त्या फक्त कोयता घासायला लावतायत”, बजरंग बाप्पाचा पंकजा मुंडेंवर पलटवार
-महायुतीत वाद! रिपाइंला हव्यात १२ जागा; उमेदवारी न मिळाल्यास प्रचार न करण्याचा इशारा