पुणे : विधानसभा निवडणूक जाहीर होण्यासाठी काही तास उरले असताना कसबा विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा पोस्टरबाजी झाल्याच पाहायला मिळत आहे. भाजपकडून इच्छुक असणारे हेमंत रासने यांच्या समर्थकांकडून कसब्यात ही पोस्टरबाजी करण्यात आली. “उतणार नाही मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही…” म्हणत जनतेची प्रामाणिकपणे सेवा करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. निवडणूक जाहीर करण्यापूर्वी काही तासांपूर्वी लागलेल्या बॅनर्सची मतदारसंघात चर्चा रंगली आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी हेमंत रासने यांच्या शहराध्यक्ष धीरज घाटे हे आग्रही आहेत. काही दिवसांपूर्वीच कसबामध्ये जोरदार पोस्टरवॉर रंगल्याच देखील पाहायला मिळालं होतं. आता पुन्हा काँग्रेसच्या एकदा विद्यमान आमदारांना विकास कामावरून टार्गेट करतानाच रासने यांच्या समर्थनार्थ पोस्टर लागल्याचे पाहायला मिळत आहे.
पदाधिकाऱ्यांनी केलेल्या मतदानात ८० टक्के मतदान रासने यांना?
बहुचर्चित कसबा विधानसभामध्ये हेमंत रासने, धीरज घाटे आणि कुणाल टिळक यांच्यातून एक नाव निश्चित होण्याची शक्यता आहे. केंद्र, प्रदेश, शहर आणि विधानसभा स्तरावरील पदाधिकाऱ्यांकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील आपल्या पसंतीच्या तीन उमेदवारांना मते देण्यात आली. कसबा विधानसभा मतदारसंघात ८० टक्के मतं हे हेमंत रासने यांना मिळाले असल्याची माहिती पक्षातील सूत्रांनी दिली. वरिष्ठांकडे पाठवण्यात आलेली नावं, पक्षाच्या पातळीवर करण्यात आलेले सर्वेक्षण, इलेक्टिव मेरिटवर तिकीट जाहीर होणार असल्यामुळे आता भाजप कसब्यासाठी काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“दोन पिढ्यांपासून त्या फक्त कोयता घासायला लावतायत”, बजरंग बाप्पाचा पंकजा मुंडेंवर पलटवार
-महायुतीत वाद! रिपाइंला हव्यात १२ जागा; उमेदवारी न मिळाल्यास प्रचार न करण्याचा इशारा
-पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; आणखी २ मेट्रो सुरु होणार, कोणत्या मार्गाने धावणार?
-पुणे शहर मार्केटयार्ड ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी विश्वास दिघे