पुणे : महाराष्ट्र आणि झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुका काही वेळातच जाहीर होण्याची शक्यता आहे. दुपारी ३:३० वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार असून निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच आज निवडणुका जाहीर झाल्या तर झारखंड आणि महाराष्ट्रामध्ये आचारसंहिता लागू होणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपालांकडून १२ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सामाजिक समीकरण साधत पंकज भुजबळ आणि इद्रिस नायकवडी यांना संधी दिली मात्र, या निर्णयानंतर त्यांच्या पक्षात नाराजी पहायला मिळाली आहे. अजित पवारांच्या पुण्यातील राष्ट्रवादीचे नेते दीपक मानकर यांना डावलण्यात आल्याचा आरोप रामदास गाडे पाटील यांनी केला आहे. त्यानंतर गाडे पाटील हे पदाचा राजीनामा देणार असल्याचे बोलले जात आहे.
विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त आमदारांची यादी जाहीर करुन त्यांना सपथ देण्यात आली. ‘राष्ट्रवादी काँग्रेसने दीपक मानकर यांना संधी द्यायला पाहिजे होती.. ज्यांच्या घरात सतत आमदार खासदार मंत्रिपद आहे, अशांनाच वारंवार संधी देण्यात आली आहे’, असे रामदास गाडे पाटील म्हणाले आहेत.
मराठा समाजाला जाणून बुजून डावलण्याचा प्रकार समोर येत आहे. कायम मराठा समाजाच्या ताकदवर कार्यकर्त्यांना पक्षात दुय्यम भूमिकेत वागवलं जात असून एका विशिष्ट समाजाला कायम झुकतं माप दिल गेलंय. मराठा समाजाचा पक्षात उद्रेक झाला. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत याची पक्षाला मोठी किंमत मोजावी लागेल, याची पक्षाने गंभीर दखल घ्यावी. पक्षाच्या प्रमुखांकडे पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा सोपवणार आहे’, असेही गाडे पाटील यांनी सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही…’ कसब्यात रासनेंच्या समर्थनार्थ पोस्टर
-“दोन पिढ्यांपासून त्या फक्त कोयता घासायला लावतायत”, बजरंग बाप्पाचा पंकजा मुंडेंवर पलटवार
-महायुतीत वाद! रिपाइंला हव्यात १२ जागा; उमेदवारी न मिळाल्यास प्रचार न करण्याचा इशारा
-पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; आणखी २ मेट्रो सुरु होणार, कोणत्या मार्गाने धावणार?