पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. आज निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. दुसरीकडे अनेक पक्षांचे नेते सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेताना दिसत आहेत. ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या हालचाली दिसून येत आहेत. अशातच आज पुण्यात मोदी बागेत शरद पवारांच्या भेटीसाठी अनेक नेत्यांनी हजेरी लावली, यावेळी अजित पवार गटाचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी शरद पवारांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला धक्यावर धक्के बसत असतानाच उमेश पाटील यांनी आपल्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा दिला अन् आज शरद पवारांच्या भेटीला पोहचले आहेत. पक्ष सोडू नये म्हणून वरिष्ठ पातळीवरुन प्रयत्न केले जात आहेत. मात्र, उमेश पाटील आपल्या राजीनाम्यावर ठाम आहेत. महाविकास आघाडीमधील पक्षांकडून पाटलांना पक्षप्रवेशाचे निमंत्रण मिळाले आहे. तरीही आता उमेश पटील तुतारी वाजवणार की हाती मशाल घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. त्यातच त्यांनी आज शरद पवारांची भेट घेतल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे.
‘मोहोळची चर्चा आधीपासून आहे, मी जेव्हापासून सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात आहे, तेव्हापासून माझा तेथील हुकूमशाहीला आणि दडपशाहीला माझा विरोध आहे. तो विरोध पक्ष एकत्र असताना आणि शरद पवारांसोबत काम करत असताना पासूनचा आहे. तो नवीन नाही. त्या ठिकाणी असलेली परिस्थितीबाबत बोलण्यासाठी मी आज शरद पवारांच्या भेटीसाठी आलो आहे’, असे उमेश पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले आहेत.
दरम्यान, ऐन निवडणुकीच्या तोंडावर उमेश पाटलांनी अजित पवारांची साथ सोडली तर त्यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसणार आहे. पिंपरी-चिंचवडचे माजी आमदार विलास लांडे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचे बंधू शरद पवारांच्या भेटीला ‘मोदी बाग’ येथे पोहचले आहेत. भाजपचे नेते, पृथ्वीराज जाचक हे सुद्धा शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे बोलले जात आहे.
महत्वाच्या बातम्या-
-महायुतीत वाद! रिपाइंला हव्यात १२ जागा; उमेदवारी न मिळाल्यास प्रचार न करण्याचा इशारा
-पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; आणखी २ मेट्रो सुरु होणार, कोणत्या मार्गाने धावणार?
-पुणे शहर मार्केटयार्ड ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी विश्वास दिघे
-‘मतदारसंघात चांगलं काम केलं म्हणून चालत नाही, ते सगळ्यांना वाटलं पाहिजे’- आमदार माधुरी मिसाळ
-वाढत्या महिला अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; तीनतोंडी रावणाच्या पोस्टर्सचे केले दहन