पुणे : राज्यात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून दावे केले जात आहेत. महायुतीचा घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने विधानसभा निवडणुकीसाठी १२ जागा हव्या असून या १२ जागांवर रिपाइंने दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रिपाइंचे राज्य संघटक परशूराम वाडेकर यांनी सोमावारी पत्रकारांशी संवाद साधला. ‘पुण्यातील १२ जागांपैकी शहरातील पुणे कॅन्टोन्मेंट हा मतदारसंघ मिळावा, अशी मागणीही वाडेकरांनी केली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत पक्षाला प्रतिनिधित्व दिले नाही तर, निवडणुकीचा प्रचार केला जाणार’ नसल्याचंही वाडेकरांकडून सांगण्यात आले आहे.
‘सत्ता मिळवायची असेल तर, तडजोड करणे आवश्यक आहे. या विचारातून आंबेडकरी चळवळीच्या विचारधारेच्या विरोधी असलेल्या राजकीय पक्षांशी युती करण्याचे धैर्य केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दाखवले. मात्र, या निर्णयाचा फायदा चळवळीतील नेते, कार्यकर्त्यांना कमी आणि भाजपला अधिक होत असल्याचे गेल्या १५ वर्षातील चित्र आहे. यामुळे आंबेडकरी समाजात नाराजीचे वातावरण आहे’, असे वाडेकर म्हणाले आहेत.
लोकसभेला रिपाइंला संधी नाही मिळाली. विधानसभा निवडणुकीत किमान १२ जागा मिळाव्यात ही पक्षाची भाजपकडे मागणी आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव असून यामध्ये आंबेडकरी समाजाची मते निर्णायक आहेत, यामुळे हा मतदारसंघ मिळावा, अशी मागणी भाजपकडे करण्यात आली आहे, असे परशूराम वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; आणखी २ मेट्रो सुरु होणार, कोणत्या मार्गाने धावणार?
-पुणे शहर मार्केटयार्ड ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी विश्वास दिघे
-‘मतदारसंघात चांगलं काम केलं म्हणून चालत नाही, ते सगळ्यांना वाटलं पाहिजे’- आमदार माधुरी मिसाळ
-वाढत्या महिला अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; तीनतोंडी रावणाच्या पोस्टर्सचे केले दहन
-शेळकेंना अडचणीत आणण्यासाठी पवारांची खेळी; भाजपमधीलच मोहरा गळाला?