पुणे : विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारची आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये (Cabinet Meeting) पुणेकरांना वाहतूकमुक्त करण्यासाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे शहरामध्ये मेट्रोचे जाळे विस्तृतपणे पसरत आहे. अशातच आजच्या बैठकीमध्ये देखील पुण्यात मेट्रोच्या (Pune Metro) आणखी दोन मार्गांना मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या दोन मार्गामुळे पुणेकरांचा प्रवास आणखी सुखद होणार आहे.
राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठकीत खडकवासला-स्वारगेट-हडपसर-खराडी आणि नळस्टॉप-डहाणूकर कॉलनी-वारजे-माणिकबाग या २ मार्गांना मंजुरी देण्यात आली आहे. खडकवासल्याहून खराडीकडे जाणाऱ्या मेट्रो मार्गामध्ये दळवी वाडी, नांदेड सिटी, धायरी फाटा, माणिकबाग, हिंगणे, राजाराम पूल, पु.ल. देशपांडे उद्यान, दांडेकर पूल, स्वारगेट स्थानक असा मार्ग असणार असून पुढे हडपसर मार्गे खराडीला जाणार आहे. तसेच दुसरी मेट्रो नळस्टॉपपासून पौड फाटा, कर्वे पुतळा, डहाणूकर कॉलनी, कर्वेनगर, वारजे, दौलत नगर (सनसिटी) या मार्गे माणिकबाग असा मेट्रोचा मार्ग असणार आहे.
जाळे मेट्रोचे, पुण्याच्या प्रगतीचे…#पुणे #मेट्रो #खडकवासला #खराडी #नळस्टॉप #माणिकबाग #Pune #Metro #Khadakwasla #Kharadi #NalStop #ManikBaug @mieknathshinde @Dev_Fadnavis @AjitPawarSpeaks pic.twitter.com/N9Lx8PdvFM
— Murlidhar Mohol (@mohol_murlidhar) October 14, 2024
राज्य सरकारने या दोन मेट्रो प्रकल्पांसाठी ९ हजार ८९७ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे. या मेट्रो मर्गाची लांबी ३१.६३ किमी असणार आहे. तर यामध्ये २८ स्थानकांची उभारणी होणार आहे. यामुळे पुणे शहरातील मेट्रोचे जाळे चौफेर वाढणार आहे आणि भक्कम होणार आहे. शहरात मेट्रोच्या विस्तारामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकर कमी होण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुणे शहर मार्केटयार्ड ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी विश्वास दिघे
-‘मतदारसंघात चांगलं काम केलं म्हणून चालत नाही, ते सगळ्यांना वाटलं पाहिजे’- आमदार माधुरी मिसाळ
-वाढत्या महिला अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; तीनतोंडी रावणाच्या पोस्टर्सचे केले दहन
-शेळकेंना अडचणीत आणण्यासाठी पवारांची खेळी; भाजपमधीलच मोहरा गळाला?
-शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे सेनेला ऑफर अन् काँग्रेसची कोंडी