पुणे : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पर्वती मतदारसंघात आतापर्यंत केलेल्या विकासकामांचे आणि पुढील ५ वर्षात मतदारसंघात काय कामे केली जातील? याबाबत आमदार माधुरी मिसाळ यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी मिसाळ यांनी आतापर्यंत मतदारसंघात केलेल्या विकासकामांची यादी वाचून दाखवली. तसेच नागरिकांसाठी काय काय कामे करता येतील? याबाबत मिसाळ यांनी भाष्य केले आहे.
‘मतदारसंघात मी चांगलं काम केलं आहे असे मी बोलून चालणार नाही. मी चांगलं काम केले आहे असे सगळ्यांना वाटलं पाहिजे. या कामांचा मंत्रिपदाशी संबंध जोडला नाही पाहिजे. कारण मंत्रिपदाबाबत पक्षच ठरवत असतो. तसेच मनुष्य स्वभाव असतो की, आपण खुप काही चांगली कामे केली आहेत. आपल्याला मंत्रिपद मिळाले पाहिजे. तेवढ्यापर्यंत आपली राजकीय रनणीती पोहचली नसेल. परंतु कदाचित पुढच्या काळात ती पोहचेल अन् मला मंत्रिपद मिळेल’, असे यावेळी आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या आहेत.
‘माझ्या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असल्याने सुरक्षितेच्या कारणामुळे अनेक ठिकाणी सीसीटिव्ही कॅमरे बसवले आहेत. शहरात गुन्हेगारींच्या घटना वाढल्या आहेत. त्यादृष्टीने अनेक भागात पोलीस स्टेशन दूर आहेत. याच हेतूने स्मार्ट पोलीस स्टेशन बनवून देण्याचा मानस आहे. यासह आरोग्याच्या दृष्टीनेही देखील मोठे रूग्णालय नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. अग्निशामक कर्मचाऱ्यांसाठी तसेच नागरिकांसाठी ३ हजार शौचालयेही बांधून देण्यात आली आहेत’.
‘पर्वती हे लोकांचे आता टुरिझम पॉईंट झाले आहे. त्याठिकाणी हजारो वर्षांचा ऐतिहासिक ठेवा आपण जपून ठेवला पाहिजे. त्यादृष्टीने आपली कामे सुरू झाली आहेत. त्याठिकाणी एक चाफ्याचं झाड आहे. तिथे ‘चापा बोलतो’, या थिममध्ये आपण पेशव्यांचा इतिहास सांगणार आहोत. सध्या आमच्या भागात सध्या २५० छोटी मोठी कामे सुरू आहेत. यासह खडकवासला धरणाच्या बाजूला लोकांसाठी जॉंगिक ट्रक बनविण्याचा विचार आहे. यासह अनेक अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्याठिकाणी नवीन काहीतरी करण्याचा विचारही सुरू आहे’, असे माधुरी मिसाळ म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-वाढत्या महिला अत्याचाराविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन; तीनतोंडी रावणाच्या पोस्टर्सचे केले दहन
-शेळकेंना अडचणीत आणण्यासाठी पवारांची खेळी; भाजपमधीलच मोहरा गळाला?
-शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे सेनेला ऑफर अन् काँग्रेसची कोंडी
-‘पर्वती’त आता बदलाचे संकेत! आबा बागुल समर्थकांचे पुन्हा काँग्रेस भवनात शक्तिप्रदर्शन
-पुण्यातील कलाकारांना मिळाले हक्काचे ठिकाण, पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्रामचे लोकार्पण