पुणे : विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुणे शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत महिलांवर अत्याचार होत आहेत. महिलांवर होणारे लैंगिक अत्याचार, छेडछाड, विनयभंग अशा अनेक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. या सर्व घटनांनी पुणे शहर चांगलेच हादरुन गेले आहे. यावरुनच आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर आगपाखड करताना दिसत आहेत. त्यातच आज पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
शहरात होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांविरोधात राज्यभरातून संतापाची लाट उसळली असून विविध संघटनांकडून अनेक भागात आंदोलन करण्यात येत आहे. शहरातील गुडलक चौकात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये ‘वध तीन तोंडी रावणाचा, लढा स्त्री सन्मानाचा’ अशा आशयाच पोस्टर्स हातात घेतले होते. या आंदोलनामध्ये महिलांनी हातात घेतलेल्या या पोस्टर्सवर तीन तोंडी रावणाचा फोटो होता या रावणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंंत्री अजित पवार यांचे चेहरे लावण्यात आले होते. हे पोस्टर्स मेणबत्तीने पेटवत महिलांवरील अत्याचाराविरोधात निषेध नोंदवला आहे.
देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्राची दशा करणाऱ्या महायुती सरकारच्या विरोधात, महाराष्ट्रातील महिला अत्याचारांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने तीन तोंडी रावणाचे दहन करून आंदोलन करण्यात आले.
संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी महिलांवर असंख्य अत्याचार… pic.twitter.com/UEhUyMdpEk
— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) October 14, 2024
प्रशांत जगताप काय म्हणाले?
‘राज्यातील अनेक भागांत दररोज प्रत्येक क्षणाला महिला, लहान मुलीवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत. तसेच शाळा, महाविद्यालय परिसरात रोडरोमिओकडून मुलींना त्रास देण्याच्या घटना घडत आहेत. या सर्व घटना लक्षात घेतल्यावर राज्यातील महिला, मुली सुरक्षित नाही आणि दुसर्या बाजूला राज्यातील मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री दौरे, बैठका घेत आहेत. या सरकारला कोणाचेही काही देणेघेणे नाही. हे असंवेदनशील सरकार आहे. त्यामुळे हे सरकार राज्यपालांनी बरखास्त करावे, तसेच अन्याय अत्याचार करणार्या नराधमांना तातडीने शिक्षा करावी, अशी आमची मागणी आहे.’
महत्वाच्या बातम्या-
-शेळकेंना अडचणीत आणण्यासाठी पवारांची खेळी; भाजपमधीलच मोहरा गळाला?
-शरद पवारांच्या राष्ट्रवादीची ठाकरे सेनेला ऑफर अन् काँग्रेसची कोंडी
-‘पर्वती’त आता बदलाचे संकेत! आबा बागुल समर्थकांचे पुन्हा काँग्रेस भवनात शक्तिप्रदर्शन
-पुण्यातील कलाकारांना मिळाले हक्काचे ठिकाण, पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्रामचे लोकार्पण
-बिग बॉस विजेत्या सुरजने पुण्यात अजित पवारांची घेतली भेट; दादांकडूनही मिळणार मोठं गिफ्ट!