पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीकडून जागावाटपासाठी बैठका सुरु आहेत. या बैठकींमध्ये अनेक जागांवर महाविकास आघाडीतील मित्रपक्षांचे एकमत झाले. मात्र, काही जागांवर अद्यापही मतभेद असल्याचे पहायला मिळत आहे. त्यातच पुण्यातील हडपसरच्या जागेवरुन महाविकास आघाडीत एकमत होत नसल्याचे पहायला मिळत आहे.
हडपसरच्या जागेसाठी ज्येष्ठ नेते शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची शिवसेना हे दोन्ही पक्ष आग्रही आहेत. यावर तोडगा काढण्यासाठी शरद पवार हे शिवसेनेला वेगळी ऑफर दिली असल्याचे बोलले जात आहे. मात्र सेनेला दिलेल्या या ऑफरमुळे काँग्रेसने दावा केलेली जागा धोक्यात येऊ शकते. त्यामुळे येत्य काळात आघाडीतील जागावाटपाचा तिढा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
दरम्यान, पुण्यातील कसबा, कॅन्टोन्मेंट, शिवाजीनगर सोबतच पर्वतीची जागा देखील आपल्याला मिळावी यासाठी काँग्रेसकडून प्रयत्न सुरु आहेत. पर्वतीमधून काँग्रेस नेते आणि माजी उपमहापौर आबा बागुल हे इच्छुक असून त्यांनी चांगलीच फिल्डींग लावल्याचे पहायला मिळत आहे. बागुल यांनी दोन वेळा शरद पवारांची भेट घेतली असून हा मतदारसंघ काँग्रेसला सोडावा, अशी मागणी केली आहे. या सर्व राजकीय घडामोडी पाहता हडपसरच्या जागेवरील सेना-राष्ट्रवादीचं एकमत होतं का? की काँग्रेसने दावा केलेली पर्वतीची जागा सेनेकडे जाणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘पर्वती’त आता बदलाचे संकेत! आबा बागुल समर्थकांचे पुन्हा काँग्रेस भवनात शक्तिप्रदर्शन
-पुण्यातील कलाकारांना मिळाले हक्काचे ठिकाण, पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्रामचे लोकार्पण
-बिग बॉस विजेत्या सुरजने पुण्यात अजित पवारांची घेतली भेट; दादांकडूनही मिळणार मोठं गिफ्ट!
-राज्य सरकारचं महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट; आता मिळणार थेट टाटा कंपनीत नोकरी, पगार किती?
-‘राजकारणात कोण कुठे होता अन् कुठे असेल, काहीच सांगता येत नाही’- संभाजी राजे छत्रपती