पुणे शहराची ओळख सांस्कृतिक राजधानी म्हणून असून शहराने हजारो कलाकार घडवले आहेत. भविष्यात पुण्यातील कलाकारांसाठी हक्काचे ठिकाण म्हणून ओळखला जाणारा पथदर्शी प्रकल्प कलाग्रामचे आज उद्घाटन पार पडले. केंद्रीय सहकार व नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार माधुरी मिसाळ यांच्या प्रयत्नातून साकारण्यात आलेल्या कलाग्रामचे लोकार्पण पार पडले.
यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले, “आपलं पुणे ही जशी सांस्कृतिक नगरी आहे, तशीच ती कलाकारांची देखील नगरी आहे. कलाकरांना आपले कलाविष्कार सादर करण्यासाठी विविध व्यासपीठे पुण्यनगरीने उपलब्ध करुन दिलेली आहेत. आणि आता याच पुण्यनगरीत कलाकारांसाठी हक्काचं व्यासपीठ असणारं ‘कलाग्राम’ नक्कीच मोठा आधार ठरणारं आहे. या ‘कलाग्राम’च्या माध्यमातून विविध कलाविष्कार सादर करण्याची संधी कलाकारांना मिळणार असून कलाकारांना आपले कलाविष्कार लोकांपर्यंत पोहोचणं सहज शक्य होणार आहे.
आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या, सिहंगड रोड ला 50 एकर जागा यामध्ये पहिल्या फेजमध्ये पु. ल. देशपांडे उद्यान झाले, आता कलाग्राम झाले म्हणजे पूर्ण 50 एकर विकसित करण्याचे स्वप्न पूर्ण झाले. पुढे पु. ल. देशपांडे कट्टा विकसित केला जाईल. ज्यामध्ये पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित कला, साहित्याचे सादरीकरण करण्यात येईल. बांबू दगडांपासून तयार करण्यात आलेल्या वस्तू आणि ग्रामीण कलाकृतींच्या प्रात्यक्षिकांसह विविध राज्यांमधील लोककला आणि खाद्यपदार्थांची मेजवानी पुणेकरांना एकाच शताकाली येथे उपलब्ध होणार आहे.
याप्रसंगी माधुरी मिसाळ, महापालिका आयुक्त राजेंद्र भोसले, दीपक मिसाळ, शहराध्यक्ष धीरज घाटे, करण मिसाळ, श्रीकांत जगताप, किरण ठाकूर यांची उपस्थित होते. वास्तूरचनाकार तीर्था मिसाळ यांचा सत्कार करण्यात आला.