पुणे : बिग बॉस मराठीचे पाचवे पर्व संपले पण अद्यापही चर्चा सुरु आहे ती बिग बॉस विजेता सुरज चव्हाणची. सुरज चव्हाण बिग बॉसच्या घरात असताना संपूर्ण महाराष्ट्राने त्याला साथ दिली. प्रेक्षकांनी सुरज चव्हाणला मोलाची साथ तर दिलीच पण राज्याच्या अनेक राजकीय नेत्यांनी देखील सुरजला पाठिंबा दिला. तसेच बारामतीचे पवार कुटुंब देखील सुरजच्या पाठिशी होते. सुरज विजयी झाल्यानंतर आज पुण्यामध्ये त्याने उपमुख्यमंत्री अजित पवारांची भेट घेतली आहे.
सुरजचे घर लहान आहे… त्याला गावात घर बांधून द्या, अशा सूचना यावेळी अजित पवार यांनी दिल्या आहेत. बिग बॉसच्या घरातच सुरजच्या घराची बरीच चर्चा झाली. इतकंच नव्हे बिग बॉसमधील स्पर्धक अंकिता वालावलकर हिनेही त्याला घर देण्याचे सांगितले होते. पण आता थेट उपमुख्यमंत्र्यांची सूरजला घर गिफ्ट केले आहे.
‘मी तुला घर बांधून देईल’, असे स्वत: अजित पवार सुरजला म्हणाले आहेत. यावेळी अजित पवार यांनी शाल, पुप्षगुच्छ आणि शिवाजी महाराजांची मुर्ती देत सुरज चव्हाणचा सत्कार केला. सुरजने अजित पवारांना बिग बॉसच्या घरातील काही किस्से देखील सांगितले. त्यावेळी त्याच्या बोलण्यावरुन अजित पवारांना देखील हसू आवरत नव्हते. सूरजने अजित पवारांना सांगितलं की, ‘दादा ट्रॉफी बारामतीमध्ये आणायची हे मी आधीच ठरवलं होतं. मला बिग बॉसनेही खूप सपोर्ट केला. मी जे बोलतो ते करुन दाखवतोच.’
महत्वाच्या बातम्या-
-राज्य सरकारचं महिलांना आणखी एक मोठं गिफ्ट; आता मिळणार थेट टाटा कंपनीत नोकरी, पगार किती?
-‘राजकारणात कोण कुठे होता अन् कुठे असेल, काहीच सांगता येत नाही’- संभाजी राजे छत्रपती
-दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरात नव्याने ७ पोलीस स्टेशन सुरु; गुन्हेगारीला बसणार आळा