पुणे : राज्यात येत्या काही दिवसांतच विधानसभा निवडणुकीचं बित्गुल वाजण्याची शक्यता आहे. राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. अनेक नेत्यांना पक्षात उमेदवारी मिळत नसल्याचे समजताच पक्ष सोडून ज्या पक्षात उमेदवारी मिळू शकते अशा पक्षांत प्रवेश करत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राज्यात तिसरी आघाडी देखील तयार करण्यात आली आहे.
तसेच स्वराज्य पक्ष स्थापनेची घोषणा संभाजी राजे यांनी शुक्रवारी केली. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या कार्यक्रमाला राज्य सरचिटणीस धनंजय जाधव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. भगव्या टोप्या घातलेल्या कार्यकर्त्यांनी सभागृह भरले होते. निवडणूक आयोगाने संभाजीराजेंच्या संघटनेला महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून मान्यता दिली आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाला “सप्तकिरणांसह पेनाची निब” हे निवडणूक चिन्ह देण्यात आले आहे.
‘राजकारणाची सध्याच्या नेत्यांनी बजबजपुरी केली आहे. कोण कुठे होता आणि कुठे असेल, काहीच सांगता येत नाही. राजकारणातील हा गोंधळ दूर करण्यासाठी स्वराज्य पक्षाची निर्मिती आहे. येणाऱ्या विधानसभेत आम्ही परिवर्तन महाशक्ती तयार करून प्रस्थापितांना धडा शिकवू’, असा निर्धार संभाजी राजे छत्रपती यांनी व्यक्त केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरात नव्याने ७ पोलीस स्टेशन सुरु; गुन्हेगारीला बसणार आळा
-शरद पवारांच्या राष्ट्रवादीत कलह; हर्षवर्धन पाटलांवर टीकेची झोड, अन् बंडखोरीचा इशारा