पुणे : नवरात्रोत्सव पार पडला, या नऊ दिवसांत सर्वांनीच देवीची आराधना केली, पूजन करत नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला. विजयादशमी दसऱ्याचा दिवस असून पर्वती भागातील शिवदर्शन येथील लक्ष्मीमातेचं रुप आज चांगलंच खुलून दिसत आहे. कारण आज लक्ष्मीमातेला ५ किलोंचे सोन्याची आभूषणे तसेच २५ किलो चांदीची साडी नेसवण्यात आली आहे. माजी उपमहापौर आबा बागुल कुटुंबियांकडून ही आभूषणे आणि चांदीची साडी अर्पण करण्यात आली आहे.
नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये लक्ष्मीमातेच्या मंदिरात अनेक विविध कार्यक्रम आयोजित केले गेले. या कार्यक्रमांना भाविकांनी मोठा प्रतिसाद देत गर्दी केली होती. भाविकांचा उत्साह आणि भक्तीमय वातावरण आजही दिसून येत आहे. लक्ष्मीमातेला चांदीची साडी नेसवल्याने तसेच सोन्याचे अलंकार परिधान केल्याने मातेचे मनमोहक रुप पाहण्यासाठी भाविकांनी आजही मोठी गर्दी केली आहे.
पर्वती भागात असणारे हे लक्ष्मीमातेचे मंदिर खूप प्रसिद्ध असून ही लक्ष्मीमाता नवसाला पावणारी असल्याचे मानले जाते. तसेच या मातेला २५ किलोंंची सोन्याची साडी ही बागुल कुटुंबाकडून अर्पण करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-दसऱ्याच्या मुहूर्तावर शहरात नव्याने ७ पोलीस स्टेशन सुरु; गुन्हेगारीला बसणार आळा
-शरद पवारांच्या राष्ट्रवादीत कलह; हर्षवर्धन पाटलांवर टीकेची झोड, अन् बंडखोरीचा इशारा