पुणे : आज विजयादशमी पुण्यातील सारसबाग परिसरामधील श्री महालक्ष्मी मंदिरामध्ये सकाळपासून प्रचंड गर्दी पहायला मिळत आहे. या देवीला तब्बल १७ किलो सोन्याची साडी परिघान करण्यात आली आहे. २१ वर्षांपूर्वी एका भक्ताने ही साडी देवीला अर्पण केली आहे. महालक्ष्मीला ही साडी वर्षातून २ वेळा दसरा आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नेसवली जाते. देवीचे हे सुवर्णवस्त्रातील रुप पाहण्यासाठी भाविकांची सकाळपासून चांगलीच गर्दी पहायला मिळत आहे.
देवीला परिधान केलेल्या साडीवर आकर्षक असे नक्षीकाम करण्यात आले आहे. ही साडी तब्बल १७ किलो सोन्याची असून ही साडी परिधान केलेले श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी आणि देव देवीला पाहण्यासाठी भक्तांकडून दरवर्षी गर्दी केली जाते. आजही विजयादशमी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर महालक्ष्मीला सोन्याची साडी परिधान केल्याने मातेचं सुवर्ण वस्त्रातील रुप पाहण्यासाठी प्रचंज गर्दी झाल्याचे पहायला मिळत आहे.
देवीला परिधान केलेली सोन्याची साडी ही दक्षिण भारतातील कारागिरांनी तयार केलेली आहे. २१ वर्षांपूर्वी देवीच्या मुर्तीसाठी ही सोन्याची साडी तयार करण्यात आली होती. अनेक कारागिरांनी जवळपास सहा महिने ही साडी तयार करण्याचे काम केले होते. त्यानंतर ही साडी पूर्ण झाली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शरद पवारांच्या राष्ट्रवादीत कलह; हर्षवर्धन पाटलांवर टीकेची झोड, अन् बंडखोरीचा इशारा
-बोपदेव घाट प्रकरणी तिन्ही नराधमांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; अद्याप अटक नाही
-ठाकरेंचा ‘हा’ शिलेदार हाती घड्याळ घेणार! शरद पवारांच्या आमदाराला देणार टक्कर