पुणे : पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. दररोज नवनवीन घटना घडत आहे. महिला अत्याचाराच्या रोज घटना घडलेल्या पहायला मिळत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी शहरातील बोपदेव घाटामध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेला आता तब्बल ९ दिवस उलटून गेलेत. तरीही आरोपींचा अद्याप कोणताही तपास लागलेला नाही. या घटनेने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असूनही शिवाय आरोपींचे सगळीकडे स्केच शेअर केले. आरोपींची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले आहे. तरी देखील या घटनेतील आरोपींचा कोणताही सुगावा लागत नसल्याचे चित्र आहे. बलात्कार प्रकरणातील पसार झालेल्या तीन आरोपींना पकडण्यासाठी पोलीस सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या प्रकरणी अनेक राजकीय नेत्यांनी देखील भाष्य केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया यांनी या ठिकाणाची पाहणी देखील केली. तसेच आढावा घेत आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्याबाबत पोलिसांशी संवाद साधला.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या ६० टीम पोलिसांनी तयार केल्या आहेत. मात्र या प्रकरणाला आता ९ दिवस उलटले तरीही आरोपी अद्याप मोकाट फिरत आहेत. त्यामुळे आता पुणे पोलिसांच्या तपास कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सर्व स्तरातून या घटनेचा आणि पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत रेकॉर्डवरील ४०० गुन्हेगारांची झाडझडती केली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर आमदार माधुरी मिसाळांनी सांगितला ‘तो’ किस्सा
-बागुल कुटुंबाच्या आदर्शाचा गौरव, जनसेवा फाउंडेशनतर्फे आदर्श एकत्र कुटुंब पुरस्कार
-पोर्शे कार अपघातातील आरोपीला निबंध लिहायला सांगाणाऱ्या ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई
-रतन टाटांच्या प्रेयसीची खास पोस्ट; जुना फोटो शेअर करत म्हणाल्या…