पुणे | मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळताच संपुर्ण महाराष्ट्रात आनंदाचं वातावरण तयार झाले आहे. केंद्र सरकारकडून याबाबत निर्णय घेतल्यानंतर संपुर्ण समाज माध्यमात अभिनंदन करत आनंद साजरा केला जात आहे. मराठीसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला आहे. आता यासाठी सर्वात प्रथम विधानसभेत आवाज उठवल्याचा दाखला पर्वती मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी दिला आहे. त्यांनी नुकतीच एका मुलाखतीचा याचा उल्लेख केला आहे.
‘मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पाहिजे, यासाठी विधानसभेत २०१३ ला मागणी केली होती. त्यावेळी काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पुढे काय काय होईल? याबाबत कुणालाही याची माहिती नव्हती. त्यासंदर्भात सभागृहात माहिती दिली होती. तेव्हा मला समजून सांगायला लागलं होतं. याबाबत एक प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तो प्रस्ताव रंगनाथ पठारे यांच्याकडे घेऊन गेले होते’, असे माधुरी मिसाळ यांनी सांगितलं आहे.
या सर्वांबाबत आम्ही सगळे पुरावे जमा केले होते. त्याच्या पुस्तिकाही छापून लोकांनाही वाटल्या होत्या. यातच सासवड येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात याबाबत एक स्टॉल लावला होता. त्या स्टॉलवर मराठी भाषेसंदर्भात सगळे पुरावे लोकांसमोर ठेवले होते. तेव्हा एक नोट बुक देखील ठेवली होती. त्यात जवळपास लाख ते सव्वा लाख लोकांनी त्यावर सह्या देखील केल्या होत्या. २०१४ पासून याबाबत प्रयत्न सुरू होते. त्यावर आता केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता स्वत: ला त्याबद्दल खुप अभिमान वाटतो, असेही मिसाळ म्हणाल्या.
दरम्यान, केंद्र सरकारने १२ ऑक्टोंबर २००४ रोजी अभिजात भाषेची श्रेणी जाहीर केली होती. तेव्हा सर्वात आधी तामिळ भाषेला २००४ साली अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. त्यानंतर २००५ साली संस्कृत, २००८ मध्ये कन्नड आणि तेलगू, आणि २०१३ मध्ये मल्याळम आणि २०१४ साली ओडीया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. आता ९ वर्षानंतर केंद्र सरकारने मराठी भाषेसह, पाली, प्राकृत, आसामी आणि बंगाली या पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बागुल कुटुंबाच्या आदर्शाचा गौरव, जनसेवा फाउंडेशनतर्फे आदर्श एकत्र कुटुंब पुरस्कार
-पोर्शे कार अपघातातील आरोपीला निबंध लिहायला सांगाणाऱ्या ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई
-रतन टाटांच्या प्रेयसीची खास पोस्ट; जुना फोटो शेअर करत म्हणाल्या…
-पुणेकरांसाठी खुशखबर! 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी निघाली; पहा कसा करायचा अर्ज