पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील शाहूनगरच्या डी. वाय. पाटील स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना चक्कर आली आणि भोवळ आलेले विद्यार्थी जमिनीवर पडू लागले. विद्यार्थ्यांची ही अवस्था पालक वर्गही हादरला. या घटनेनंतर बाधित विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना अल्पोपहार म्हणून ब्रेड आणि चटणी देण्यात आली होती. यानंतर विद्यार्थ्यांना उलटी आणि मळमळ आणि चक्कर आली. काही विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. विद्यार्थ्यांना निष्कृष्ट अन्न खाऊ घालणाऱ्या शाळेच्या प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे.
“शाळेत आज अल्पोपहार ठेवला होता. ब्रेड आणि चटणी मेनू होता. ३०० ते ३५० मुलांना विषबाधा झाली आहे. गंभीर घटना झालेली आहे. सर्व पालकांची माफी मागतो. बाधित मुलांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे. जे काही खाण्याचे साहित्य आणले आहे. त्याची टेस्ट करणार आहोत. पहिली ते चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना खायला दिले. महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेली शाळा आहे. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल.” असे डी.वाय. पाटील शाळेचे संचालक अभय खोतकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-पोर्शे कार अपघातातील आरोपीला निबंध लिहायला सांगाणाऱ्या ‘त्या’ दोन अधिकाऱ्यांवर मोठी कारवाई
-रतन टाटांच्या प्रेयसीची खास पोस्ट; जुना फोटो शेअर करत म्हणाल्या…
-पुणेकरांसाठी खुशखबर! 6294 घरांसाठी म्हाडाची लॉटरी निघाली; पहा कसा करायचा अर्ज
-ऐन विधानसभेच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; संजय काकडे घेणार हाती ‘तुतारी’