पुणे : अवघ्या काही दिवसांत विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू होणार आहे. जशी निवडणूक जवळ येत आहे तसा राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांना लोकसभा निवडणुकीच्या निकालाने मिळालेल्या धक्क्यानंतर वारंवार धक्के मिळत आहेत. राज्यसभा खासदार ज्येष्ठ नेते शरद पवार हे अजित पवारांना धक्क्यावर धक्के देताना दिसत आहेत. त्यातच आता बालेकिल्ल्यात अजित पवारांना आणखी एक मोठा धक्का बसणार आहे.
‘चिंचवड विधानसभा लढण्याच्यादृष्टीने मी निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी नवा मार्ग निवडणार आहे. अजित पवारांनंतर शरद पवार (Sharad Pawar) साहेबांशी माझी नाळ अधिक जुळलेली आहे. तेव्हा तुतारी फुंकल्यावर आवाज येईलच’, असे अजित पवार गटाचे नेते नाना काटे (Nana Kate) यांनी जहीर केले आहे.
‘चिंचवड विधानसभेतून निवडणूक लढवायची, ही माझी सुरुवातीपासूनची भूमिका आहे. या भूमिकेवर मी आजही ठाम आहे. आम्हाला निवडणूक लढवायची आहे. त्यामुळे प्रत्येकजण कोणाच्या ना कोणाच्या भेटी घेत असतो. अजितदादांनी म्हटलंय की, ज्यांना लढायचं आहे, त्यांना मार्ग मोकळे आहेत. आता लढायचं म्हटलं तर कोणतातरी पक्ष आणि चिन्ह पाहिजेच. त्यामुळे आता मी निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी निर्णय घेईन’, असे नाना काटे म्हणाले आहेत.
‘ज्यांना आमदार व्हायचं आहे, ते स्वतंत्र मार्ग निवडत आहेत’, असे म्हणत पक्षांतर करणाऱ्यांसाठी अजित पवार यांनी मार्ग खुले केले आहेत. त्यानंतर काही वेळातच नाना काटेंनी आचारसंहितेपूर्वी मी माझा निर्णय घेणार असून तुतारी फुंकल्यावर आवाज येईल, असे जाहीरपणे सांगत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. त्यामुळे अजित पवारांना चिंचवड विधानसभेत मोठा धक्का बसणार असल्याचे स्पष्ट आहे.
महत्वाच्या बातम्या-
-जुन्नर विधानसभेत मोठा ट्विस्ट! राष्ट्रवादी नेत्याच्या मुलाखतीत अचानक पोहचला काँग्रेस नेता
-सस्पेन्स कायम! अजित पवार बारामतीमधून लढण्याबाबत म्हणाले, ‘महायुतीत…’
-पुण्यात शिवसेनेने दावा सोडला; हडपसरमधून इच्छुक नाना भानगिरे म्हणाले…