पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जुन्नर मतदारसंघात उमेदवारीसाठी चांगलीच रस्सीखेच सुरु असल्याचं पहायला मिळत आहे. उमेदवार निवडीसाठी इच्छुक नेत्यांच्या मुलाखती देखील घेतल्या जात आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणाऱ्या नेत्याची मुलाखत सुरु असताना तिथे अचानक काँग्रेसचा नेता पोहचल्याचं पहायला मिळालं आहे.
पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालय या ठिकाणी पुणे शहर आणि पुणे जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या इच्छुक असणाऱ्या एका नेत्याची मुलाखत सुरु असताना तिथे अचानक काँग्रेसमधून इच्छुक असणारे सत्यशील शेरकर पोहोचले. या घटनेवरुन जुन्नर विधानसभा मतदारसंघात मोठा ट्विस्ट आला आहे.
सत्यशील शेरकर हे देखील जुन्नर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्यामुळे त्यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्याच्या मुलाखतीत अशा अचानक येण्याने चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी सत्यशील शेरकर आणि विश्वजीत कदम यांच्यातील सांगली पॅटर्नचा संवाद आला होता चर्चेत, जुन्नर मध्ये सांगली पॅटर्न राबवण्यावर दोघांमध्ये चर्चा सुरु आहे. याबाबत त्यांनी प्रतिक्रिया देखील दिली आहे.
‘जुन्नरमध्ये एक दुर्दैवी घटना घडली होती. बिबट्याच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. याबाबत कोल्हे यांना भेटण्यासाठी आलो होतो. सुप्रिया सुळे, शरद पवार यांची ही भेट घेतली. त्यांना ही याबाबत मी बोललो. मुलाखती होण्याचा आणि माझा येण्याचा योगायोग आहे. इच्छुक आहेच. मी मुलाखत दिलेली नाही. माझी तयारी ही महाविकास आघाडीतून आहे’, असे सत्यशील शेरकर म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-सस्पेन्स कायम! अजित पवार बारामतीमधून लढण्याबाबत म्हणाले, ‘महायुतीत…’
-पुण्यात शिवसेनेने दावा सोडला; हडपसरमधून इच्छुक नाना भानगिरे म्हणाले…
-अजितदादांना धक्का देण्याची तयारी; सुप्रिया सुळेंच्या गाडीत तोंड लपवणारा ‘तो’ नेता कोण?
-पिंपरीत झळकले गुलाबी बॅनर्स; अण्णा बनसोडेंच्या बॅनर्सची राजकीय वर्तुळात चर्चा