पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालातून महाविकास आघाडीला अनपेक्षित यश मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषेत मवाळपणा आणि पेहरावातही चांगलाच बदल पहायला मिळाला. अजित पवारांच्या गुलाबी जॅकेटची चांगलीच चर्चा झाली. त्यांच्या गुलाबी जॅकेटवरुन राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया आल्या.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पिंपरी शहरामध्ये पुन्हा एकदा गुलाबी रंगाची चर्चा रंगली आहे. पिंपरीमध्ये तब्बल २०० गुलाबी बॅनर्स लागले आहेत. अजित पवारांनी आतापर्यंत केलेल्या प्रत्येक बंडामध्ये शेवटपर्यंत सोबत राहिलेले खंदे समर्थक पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्याकडून मतदारसंघात हे गुलाबी बॅनर्स लावण्यात आले आहेत.
आपले अण्णा, पिंपरीत पुन्हा असा लक्षवेधी मजकूर त्यावर अण्णांच्या फोटोसह आहे.उमेदवारी जवळपास नक्की झाल्याने अण्णांचे हे फलक लावल्याचे सांगण्यात आले. महायुतीच्या ज्या पक्षाचा तिथे आमदार त्या पक्षाला ती जागा मिळणार या फॉर्म्युल्यानुसार पिंपरीची जागा अजित पवारांकडे राहणार आहे. तसेच पिंपरीमधून अण्णा बनसोडेंसारखा तगडा उमेदवार नसल्याने पिंपरीची उमेदवारी अण्णा बनसोडेंनाच मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या-
-शिवसेनेच्या शिंदेंच्या गटाची पुण्यातून माघार, पण ‘या’ जागांवरुन लढणारच!
-जय शंभू महादेवा! बिग बॉस विजेता सुरज चव्हाण घरी जाण्याआधी पोहचला जेजुरी गडावर
-कार्यकर्त्यांनी केली उमेदवारीची मागणी; अजितदादा म्हणाले, ‘इथं मी मंत्री असून…’
-अंधारेंनी हडपसरमध्ये उमेदवार जाहीर केला, सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘सुषमाताई…’