पुणे : येत्या विधानसभा निवडणुसाठी सर्व पक्षांची तयारी जोमाने सुरु आहे. त्यातच महाविकास आघाडी आणि महायुतीकडून अनेक जागांवर उमेदवारीसाठी रस्सीखेच सुरु आहे. त्यातच आता महायुतीतील शिवसेना पुण्यातील एकाही जागेवर लढणार नसल्याची माहिती समोर आली आहे.
शिवसेनेचा शिंदे गट पुण्यातील एकाही जागेवर न लढता जिल्ह्यातील भोर आणि पुरंदरच्या जागेवरुन निवडणूक लढणार आहे. महाविकास आघाडीत पुण्यातील हडपसर विधानसभेची जागा लढवणार असल्याचा दावा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली असताना दुसरीकडे पुण्यातील विधानसभा लढण्याचा दावा शिवसेनेने (Shivsena) सोडला आहे.
जिल्ह्यातील भोर आणि पुरंदर या जागेवर शिंदेसेना निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे शहरातील आठही विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा एकही इच्छुक उमेदवार नाही, या आठही जागा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-जय शंभू महादेवा! बिग बॉस विजेता सुरज चव्हाण घरी जाण्याआधी पोहचला जेजुरी गडावर
-कार्यकर्त्यांनी केली उमेदवारीची मागणी; अजितदादा म्हणाले, ‘इथं मी मंत्री असून…’
-अंधारेंनी हडपसरमध्ये उमेदवार जाहीर केला, सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘सुषमाताई…’
-‘त्या’ बेकायदा गाळ्यांवर पालिकेची मोठी कारवाई; बेकायदा गाळे उभारण्यामागे कोणाचा हात?