पुणे : द हिंदू फाउंडेशन आणि भाजप प्रभाग क्रमांक २९ च्या वतीने घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धा २०२४ आणि प्रोफेशनल हेअर स्टाईल, साडी ड्रेपिंग आणि मेहंदी प्रशिक्षण आणि स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ एस पी कॉलेज येथील लेडी रमाबाई हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. पारितोषिक वितरण सोहळा भाजप महाराष्ट्र प्रदेशाचे मुख्य प्रवक्ते आणि नेते केशव उपाध्ये, स्थायी समिती पुणे महानगरपालिका माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी नगरसेविका मोनिका मुरलीधर मोहोळ, भाजप महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या हस्ते झाला.
घरचा गणपती सजावट स्पर्धेचे १ ते १५ आणि गौरी सजावट स्पर्धेतील १ ते १५ विजेत्यांना १ लाख रुपयांची रोख बक्षीस ट्रॉफी प्रमाणपत्र मा. केशव उपाध्ये यांच्या हस्ते देउन गौरवण्यात आले. हेअर स्टाईल स्पर्धेतील १ ते १० , साडी ड्रेपिंग स्पर्धेतील १ ते १० आणि मेहंदी स्पर्धेतील १ ते १० विजेत्यांना भव्य ट्रॉफी, भेटवस्तू आणि प्रमाणपत्र देउन हेमंत रासने, वर्षा डहाळे, मोनिका मोहोळ, संदीप खर्डेकर, कुणाल टिळक, राजेश येनपुरे, दिपक पोटे, बाप्पू मानकर, करण मिसाळ, राजेंद्र काकडे, नामदेव माळवदे, माधव साळुंके, आणि पाहुण्यांच्या हस्ते गौरवण्यात आले. घरचा गणपती आणि गौरी सजावट स्पर्धेत २३० कुटुंबानी सहभाग घेतला होता. तर मेहंदी, साडी ड्रेपिंग, हेअर स्टाईल प्रशिक्षण वर्गात आणि स्पर्धेत २५६ महिला युवतींनी भाग घेतला होता.
‘द हिंदू फाउंडेशन च्या वतीने आता पर्यंत तीन हजार महिलांना छोटा मोठा व्यवसाय करण्यासाठी वेगवेगळे प्रशिक्षण दिले आहे. महिलांच्या सबलीकरणा बरोबर महिलांनी समाजाचं मुख्य प्रवाहात येण्यासाठी संस्था कामं करत आहे. वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धा आयोजित करून खेळाडू यांना ही प्रोत्साहित केले जाते’, असे माजी नगरसेवक धनंजय विष्णू जाधव म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केशव उपाध्ये आपल्या भाषणात म्हणाले की, ‘ज्या पद्धतीने मेट्रोच्या माध्यमातून शहर जोडण्याचे काम होत आहे त्या पद्धतीने एका घराला दुसऱ्या घरा बरोबर जोडण्याचे काम जाधव करत आहेत. आमच्या भगिनींना जोडण्याचे काम करत आहेत, महिलांना एकत्रित जोडणं, समाजाला एकत्रित जोडणं हे या अशाच कार्यक्रमातून होत असते. मी स्वतःला भाग्यवान समजतो की, नवरात्रीच्या आधी या विराट आदिशक्तीचे दर्शन होत आहे.’
‘आपण जिजाऊ, सावित्रीबाई राणी लक्ष्मीबाई, यशोदेचे नाव घेतो पण येथे बसलेली महिला जेव्हा मुलाला शाळेत घेउन जाते तेव्हा सावित्रीबाई यांची भूमिका पार पाडते, मुलांवर संस्कार करताना जिजाऊंची भूमिका पार पाडते, संघर्ष करताना राणी लक्ष्मी बाईंच्या भूमिकेत असते. शेजारी पाजारी लहान मुलांशी बोलताना यशोदेच्या भूमिकेत असते, घराला सांभाळण्याचे, घराला आकार देण्याचे काम महिला घरी करत असते, त्यामुळे महिला ही अबला असू शकत नाही. कारण ती पुरुषापेक्षा जास्त कामे करते. हिंदू फाउंडेशनच्या वतीने हा कार्यक्रम फक्त बक्षीस देण्यापुरता नसून महिलांप्रति सन्मान व्यक्त करण्याचा हा कार्यक्रम आहे. महिला ही सुजाण असते आणि या स्पर्धेनिमित्त या महिलांच्या सुजानशिलतेला अधिक सन्मान देण्याच काम धनंजय जाधव आणि द हिंदू फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अंधारेंनी हडपसरमध्ये उमेदवार जाहीर केला, सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘सुषमाताई…’
-‘त्या’ बेकायदा गाळ्यांवर पालिकेची मोठी कारवाई; बेकायदा गाळे उभारण्यामागे कोणाचा हात?
-‘आमचा पदर-बिदर सगळं फाटून गेलंय’; अजित पवार असे का म्हणाले?
-संगम आधुनिक विकास अन् संस्कृतीचा; कसब्यात महिलांचा महाभोंडल्याला उत्स्फुर्त प्रतिसाद