पुणे : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची राज्यभर रणधुमाळी सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपावरुन अनेक जागांवर कुरभूरी पहायला मिळत आहे. अशातच महाविकास आघाडीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुण्यातील खडकवासला, वडगाव शेरी आणि हडपसरच्या जागेवरुन वाद तू-तू मै-मै सुरु आहे. त्यातच शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी (सोमवारी) काल बोलताना हडपसरमधून थेट उमेदवाराचे नावच जाहीर केले होते. त्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हडपसर मतदारसंघातून ठाकरे गटातर्फे महादेव बाबर यांना सुषमा अंधारे यांनी उमेदवारी जाहीर केली. याविषयी राऊत यांना विचारले असता, “सुषमा ताई, त्या मीटिंगमध्ये होत्या का? त्यांना फोन करून विचारेन. माझ्या माहितीनुसार कालच्या बैठकीला त्या नव्हत्या, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी सुषमा अंधारे यांना टोमणा मारला आहे.
‘जोपर्यंत जागावाटप फायनल होत नाही. तोपर्यंत मी आउट ऑफ लाईन बोलणार नाही. महाविकास आघाडीत कुठेही गैरसमज होईल. असं मी बोलणार नाही. मी जबाबदार खासदार आहे’, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-‘त्या’ बेकायदा गाळ्यांवर पालिकेची मोठी कारवाई; बेकायदा गाळे उभारण्यामागे कोणाचा हात?
-‘आमचा पदर-बिदर सगळं फाटून गेलंय’; अजित पवार असे का म्हणाले?
-संगम आधुनिक विकास अन् संस्कृतीचा; कसब्यात महिलांचा महाभोंडल्याला उत्स्फुर्त प्रतिसाद