पुणे | बारामती : राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी पक्षाने आमने-सामने येत निवडणूक लढली. मात्र उपमुख्यमंंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या एका जागेवर यश मिळालं. आपल्या भाषणातून रोखठोक मतं मांडणाऱ्या अजित पवारांची भाषा आता मवाळ झाल्याचे पहायला मिळाले आहे. तसेच सध्या पुणे शहर आणि जिल्ह्यात होणाऱ्या गुन्हेगारीवरुन अनेकांना खडसावताना देखील दिसत आहेत.
‘मुलींबाबत कोणी गैर करु नका. कोणी कितीही मोठ्या बाबाचा असला, तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. तारुण्याच्या भरात नको ते करायला जाल आणि अडचण येईल. नंतर म्हणाल दादा आमच्यावर पांघरुन घाला. पण माझ्याकडे पांघरून घालायला शिल्लक नाही. दादा मला पदरात घ्या…पदर-बिदर आमचे सगळे फाटून गेलेत, हसू नका मी सिरीयसली सांगतोय, असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.
‘कायदा फार कडक झालाय. आपल्या कुटुंबाकडे सगळ्यांनी लक्ष द्या. एक वय असतं, त्या वयात आपण प्रत्येकाने काय-काय केले ते आठवा…पण ते वय आता गेलं, आता चक्की पीसिंग अन् पीसिंग…नुसती चक्की पीसिंग नाही, आता फाशीच…. कायदा सुव्यवस्था फार महत्त्वाची जबाबदारी आहे. परवा जे टी. सी. कॉलेजमध्ये घडलं, हे माझ्याही मनाला पटलं नाही. यात तुमचंही मला सहकार्य हवं आहे. पोलीस खात्याला ही सूचना दिल्या आहेत. कुणाची दादागिरी, गुंडगिरी मी बारामतीचे नेतृत्व करतोय तोपर्यंत चालू देणार नाही. जबाबदार नागरिक म्हणून काही आपली पण जबाबदारी आहे’, असं अजित पवारांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
-संगम आधुनिक विकास अन् संस्कृतीचा; कसब्यात महिलांचा महाभोंडल्याला उत्स्फुर्त प्रतिसाद
-पक्षप्रवेश करताच हर्षवर्धन पाटलांनी सुप्रिया सुळेंना केली ‘ही’ विनंती
-हर्षवर्धन पाटलांचा पक्षप्रवेश होताच जयंत पाटलांनी केली ‘ही’ मोठी घोषणा