पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आज अधिकृतपणे प्रवेश केला आहे. २०१९ साली महाविकास आघाडीकडून तिकीट मिळाले नाही म्हणून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. आताही भाजपमधून तिकीट मिळणार नसल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी फुंकली आहे.
हर्षवर्धन पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला खरा पण त्यांच्या पक्षप्रवेशामुळे इंदापूर तालुक्यातील शरद पवार गटाचे अनेक बडे नेते नाराज झाल्याचे पहायला मिळत आहेत. या नाराज नेते, पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रवेश कार्यक्रमाला दांडी मारल्याचे पहायला मिळाले आहे. या नाराज नेत्यांची मनधरणी करण्यात खासदार सुप्रिया सुळे या असफल झाल्याचेही दिसत आहे.
इंदापूर विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे आप्पासाहेब जगदाळे, प्रवीण माने, भरत शहा, सोनाई समूहाचे प्रमुख दशरथ माने यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या प्रवेशाला इंदापुरातील नेत्यांनी विरोध दर्शवला होता. मात्र तरीही पाटलांचा आज पक्षप्रवेश झाला असून या नाराज नेत्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुप्रिया सुळे यांच्याकडून करण्यात आला. सुप्रिया सुळे यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहे. त्यामुळे जगदाळे, प्रवीण माने आणि शहांची काय भूमिका असेल? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-अजित पवार बारामतीमधून लढणार नाहीत! कोणत्या मतदारसंघाकडे वळवला मोर्चा?
-वडगाव शेरीवरुन आघाडीत बिघाडीची शक्यता; भुजबळ म्हणाले, ‘शिवसेनेला हा मतदारसंघ सोडला तर…’
-जैन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा; आमदार मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश
-‘…तर आबा बागुल कधीच मंत्री झाले असते! पण आता आम्ही प्रयत्न करतोय’- थोरात
-काकांचा-पुतण्याला धक्का; ‘हा’ माजी आमदार तुतारी फुंकण्याच्या तयारीत