पुणे : लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यात महाविकास आघाडीने चांगलेच यश मिळवले. महायुतीला अनेक जागांवर निराशा पदरी पडली. त्यातच महायुतीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. सर्वाधिक चर्चेची आणि पवारांच्या बारामतीमधील लोकसभेची लढतीकडे सर्वांच्या नजरा लागून होत्या. बारामतीमध्ये शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळेंनी उमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव केला. त्यामुळे बारामतीत अजित पवारांवर चांगलीच नामुष्की ओढवली. त्यानंतर आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार हे बारामतीमधून निवडणूक लढणार नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
लोकसभा निवडणुकीत कुटुंबाच्या विरोधात जाण्याचा फटका अजित पवारांना बसल्याने आता विधानसभेला देखील हेच चित्र पहायला मिळू नये म्हणून कदाचित असा निर्णय घेत असावे, अशी चर्चा सुरु आहे. त्यातच अजित पवार बारामतीमधून नाही तर शिरुरमधून निवडणूक लढणार असल्याचे बोलले जात आहे.
गुरुवारी अजित पवारांनी एका मेळाव्यात बोलताना ‘मी उमेदवार देईन, त्यालाच निवडणून आणा’, असं वक्तव्य केल्याने अजित पवार बारामतीमधून लढणार नसल्याचे संकेत दिले आहेत. १९९५ पासून सलग ३० वर्षे बारामतीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या अजित पवारांनी आता बारामतीमधून लढणार नसल्याचे संकेत दिले आहेत. अजित पवार आता शिरुरमधून लढणार असून अजित पवार विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अशोक पवार यांच्यात लढत पहायला मिळू शकते.
महत्वाच्या बातम्या-
-वडगाव शेरीवरुन आघाडीत बिघाडीची शक्यता; भुजबळ म्हणाले, ‘शिवसेनेला हा मतदारसंघ सोडला तर…’
-जैन समाजासाठी आर्थिक विकास महामंडळाची घोषणा; आमदार मिसाळ यांच्या पाठपुराव्याला यश
-‘…तर आबा बागुल कधीच मंत्री झाले असते! पण आता आम्ही प्रयत्न करतोय’- थोरात
-काकांचा-पुतण्याला धक्का; ‘हा’ माजी आमदार तुतारी फुंकण्याच्या तयारीत
-सुनील शेळके अजितदादांसमोर भर सभेत म्हणाले, ‘तुम्हाला दादागिरी आणि दहशत करायची असेल, तर…’