पुणे : सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचा महाराष्ट्रातील निकाल पाहता ज्येष्ठ नेते, राज्यसभा खासदार शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलेच इनकमिंग सुरु आहे. शरद पवारांनी देखील लोकसभेनंतर विधानसभा निवडणुकीची जंगी तयारी केली आहे. भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील अनेक दिग्गज नेते आपल्या गळाला लावत धक्कातंत्राचा वापर केला आहे.
अशातच आता अजित पवारांचे अत्यंत जवळचे आणि दौंड विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रमेश थोरात हे आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरणार असल्याचे संकेत दिले आहे. रमेश थोरात हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहेत. त्यामुळे भोसरी, चिंचवड आणि आता दौंडमध्ये अजित पवारांना मोठा धक्का बसणार असल्याचे दिसत आहे.
२०१९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या राहुल कूल यांनी भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढली आणि विजय मिळवला. त्यामुळे येऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये ही जागा भाजपकडे राहणार असल्याचे दिसताच निवडणूक लढण्यासाठी इच्छुक असणारे रमेश थोरात हे अजितदादांच्या राष्ट्रवादीतून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जाण्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
रमेश थोरात यांनी निवडणुकीच्यादृष्टीने मतदारसंघात तशी तयारी देखील सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवारचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक शरद पवारांच्या तुतारी चिहावर लढणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. सध्या दौंड मतदारसंघात शरद पवारांकडे तेवढा मजबूत उमेदवार नसल्याने शरद पवरांकडून देखील थोरातांना पक्षात सामील करून घेण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. यामुळे आता काका शरद पवार पुतण्या अजित पवारांना पुन्हा मोठा धक्का देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सुनील शेळके अजितदादांसमोर भर सभेत म्हणाले, ‘तुम्हाला दादागिरी आणि दहशत करायची असेल, तर…’
-युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भाजयुमोच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने
-राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? पुणे न्यायालयाने धाडले समन्स; नेमकं प्रकरण काय
-बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी आणखी मोकाट; सीसीटीव्ही फुटेज आलं समोर