पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे तसा राजकीय घडमोडींना वेग आला आहे. उमेदवारीसाठी इच्छुकांची रस्सीखेच सुरु आहे. पुण्यातील सर्वात चर्चेच्या मावळ विधानसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी कोणाला मिळणार यावरुन मावळमधले राजकारण चांगलेच तापल्याचे पहायला मिळत आहे.
मावळमध्ये महायुतीने अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही. महायुतीतल तिन्ही पक्षांमध्ये मावळच्या मतदारासंघासाठी रस्सीखेच सुरु आहे. अशातच मावळचे आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांनी शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना व्यासपीठावरुन तुफान फटाकेबाजी केली आहे.
‘मला माहिती आहे की, येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होईल. अनेकजण मावळमधून लढण्यास इच्छूक आहेत. पण महायुतीचा उमेदवार कोण? हे मला देखील माहिती नाही. पण अनेकजण तयारी करत आहेत. प्रत्येकाला संविधानाने निवडणूक लढवण्याचा अधिकार दिला आहे. जनतेला पटलं तर तुम्हालाही आमदार, खासदार करतील. पण तुम्ही तुमची इच्छा व्यक्त करताना मावळच्या जनतेला दहशतीखाली, दडपणाखाली आणू नका’, असे सुनील शेळके म्हणाले आहेत.
‘मावळच्या जनतेला दहशतीखाली आणण्याचा प्रयत्न कराल तर दादा तुमच्यासमोर सांगतो की, सुनील शेळके हा अन्याय सहन करणार नाही. प्रत्येकजण मरायला आला आहे. तुम्हाला दादागिरी आणि दहशत करायची असेल, तर सुनील शेळकेवर करा. माझ्या जनतेवर आणि सहकाऱ्यांवर दादागिरी करायची नाही’, असे सुनील शेळके यांनी म्हणाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; भाजयुमोच्या कार्यकर्त्यांकडून निदर्शने
-राहुल गांधींच्या अडचणी वाढणार? पुणे न्यायालयाने धाडले समन्स; नेमकं प्रकरण काय
-बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी आणखी मोकाट; सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
-शरद पवारांनी टिंगरेंवर केलेल्या ‘त्या’ टीकेला अजित पवारांनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाले…