पुणे : राज्यात आगामी निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. तर दुसरीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी यांना काही दिवसांपूर्वी नाशिक न्यायालयानेही स्वातंत्र्यवीर सावरकरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नोटीस बजावले होते. नाशिकच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी दीपाली परिमल कडूसकर यांनी राहुल गांधी यांना 27 ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर राहण्याचे नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे.
त्यानंतर आता पुणे न्यायालयाने देखील २३ ऑक्टोबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. 5 मार्च 2023 रोजी राहुल गांधी यांनी इंग्लंडमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते यावरून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. या प्रकरणी विनायक दामोदर सावरकर यांची नात सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधींवर मानहानीचा खटला दाखल केला आहे.
दरम्यान, राहुल गांधी सतत सावरकरांच्या प्रतिमेला हानी पोहचवत असून ते ‘सावरकर’ आडनावाची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप सात्यकी सावरकर यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-बोपदेव घाट अत्याचार प्रकरणातील संशयित आरोपी आणखी मोकाट; सीसीटीव्ही फुटेज आलं समोर
-शरद पवारांनी टिंगरेंवर केलेल्या ‘त्या’ टीकेला अजित पवारांनी दिलं सणसणीत उत्तर; म्हणाले…
-आधी बांधलं मोदींचं मंदिर, आता दिली भाजपला सोडचिठ्ठी; नेमकं काय प्रकरण?
-‘अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार अन्….’; ‘या’ माजी मंत्र्याने केला मोठा दावा
-हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीत जाणार, पण कधी? पाटील म्हणाले, ‘तो निर्णय …’