पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असताना भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्यांची संख्या वाढलेली दिसत आहे. पुण्यात एक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मंदिर अभारणाऱ्याा भाजपच्या कार्यकर्त्यांने आता पक्षाला राजीनामा दिला आहे. या भाजप कार्यकर्त्याचे नाव मयुर मुंडे असून त्यांनी २०२१ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मंदिर बांधले होते. एकेकाळी पंतप्रधान मोदींचा मोठा चाहता असणाऱ्या मयुर मुंडे यांने आता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली आहे. मयुर मुंडेने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे त्यांना पत्र लिहीत राजीनामा दिल्याचे कारण सांगितले आहे.
‘मी माझे काम गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून पार पाडत आहे. परंतु माझ्या या निष्ठेला बाजूला करून विष्ठेला या ठिकाणी स्थान दिले जात आहे. भाजपच्या अनेक माजी पदाधिकाऱ्यांचा देखील अपमान केला जात असून अनेक बैठकींना त्यांना बोलवण्यात देखील येत नाही. तसेच भाजपच्या आमदारांकडून स्वतःच्या मर्जीने वशिल्यावर त्या ठिकाणी संघटनेतील पद दिली जातात’ असा आरोप मयुर मुंडेने पत्राद्वारे केला आहे.
आमच्यावर अन्याय होत आहे. यामुळे मी सर्व पदांसह प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे मयुर मुंडे यांनी पत्रातून सांगितले आहे. कट्टर मोदी समर्थक असणाऱ्या मयुरी मुंडे यांनी सोडचिठ्ठी दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. आज भाजपला इंदापूर मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांनी देखील शरद पवारांची तुतारी फुंकणार असल्याचे सांगितले मोठा धक्का दिला आहे. यामुळे भाजपला होणार हे डॅमेज भाजप कसे भरून काढणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘अजित पवार महायुतीतून बाहेर पडणार अन्….’; ‘या’ माजी मंत्र्याने केला मोठा दावा
-हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीत जाणार, पण कधी? पाटील म्हणाले, ‘तो निर्णय …’
-हर्षवर्धन पाटलांचा मोठा गौप्यस्फोट; सांगितलं फडणवीसांसोबतच्या बैठकीत सत्य
-हर्षवर्धन पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या निर्णयावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या,
-‘राम कृष्ण हरी’ म्हणत पाटील वाजवणार ‘तुतारी’; पत्रकार परिषद घेत जाहीर केला निर्णय