पुणे : राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. पुणे जिल्ह्यातील सर्वात चर्चेच्या मतदारसंघापैकी एक असलेल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर आली आहे. भाजप नेते आणि माजी सहकारी मंत्री हर्षवर्धन पाटील हे ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने मतदारसंघातच नाही तर राजकीय वर्तुळात मोठी घडामोड घडताना दिसत आहे.
काही वेळातच पत्रकार परिषदेतून आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार आहेत. पण त्याआधीच त्यांच्या कन्या व पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील भाजपच्या सर्व पदांचा राजीनामा देणार आहे. अंकिता पाटील या भाजपच्या पुणे जिल्हा युवा मोर्चाच्या अध्यक्षा आहेत. या पदाचा त्या आजच राजीनामा देणार असल्याचे त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितले आहे.
हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत इंदापूर तालुक्यातील युवा मोर्चाचे भाजपचे पदाधिकारीही राजीनामा देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपला रामराम ठोकण्याचा त्यांचा आणि हर्षवर्धन पाटील यांना निर्णय पक्का असल्याच्या चर्चांवर शिक्कामोर्तब झाले आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात महिला असुरक्षितच; मित्रासोबत बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणीसोबत….
-‘झापूक-झुपूक’नंतर आता ‘डंके की चोटपर’; गुनरत्न सदावर्ते बिग बॉसच्या घरात
-वडिलांना की मुलाला उमेदवारी कोणाला? पुण्यात दोन मतदारसंघात ‘फॅमिली ड्रामा’
-अल्पवयीन आरोपींचं वय किती असावं? अजित पवार करणार शहांकडे मोठी मागणी
-“तो जिंकला पाहिजे” सुरज चव्हाण जिंकण्यासाठी पवार कुटुंबानं केलं बारामतीकरांना आवाहन