पुणे : राज्यात आगामी विधानसभेच वार वाहत आहे तर दुसरीकडे घराघरात मराठी बिग बॉस सिजन ५ महाविजेत्याची चर्चा सुरु आहे. या आठवड्यात ७० दिवसांचा हा बिग बॉसचा प्रवास संपणार आहे. तर दुसरीकडे बिग बॉस १८ हिंदी सीजन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘डंके की चोटपर’ म्हणणाऱ्या आणि एसटी कामगारांच्या वेतन वाढीच्या संपामुळे कायम चर्चेत असणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते आता बिग बॉस १८ हिंदी सीजनच्या घरात पहायला मिळणार आहेत.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना या सीजनमध्ये सहभागी होण्यासाठी तिकीट मिळाले आहे. माध्यमांनी विचारला की, ‘सलमान खानसोबत पंगा घेणार का, त्याला घाबरता का? यावर सदावर्ते यांनी उत्तर दिलं की, मी कायम ‘डंके की चोटपर’ बोलत असतो. ”हमारा नाम ही कॉफी है, हम गुण रतन है”, एक गुणरत्न, लाख गुणरत्न. मी कोणाला घाबरत नाही लोकच मला घाबरतात’, असे गुणरत्न सदावर्ते म्हणाले आहेत.
दरम्यान, गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नीने देखील सदावर्ते यांना साथ देत ते कायम विनर असतात, मी त्यांना बिग बॉसच्या घरात जाताना अनेक चष्मे घेऊन देणार’, अशी भावना व्यक्त केली आहे. तर १८ व्या बिग बॉसच्या हिंदी सीजनमध्ये अजून कोणते चेहरे पाहायला मिळणार हे पाहणं रंजक ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वडिलांना की मुलाला उमेदवारी कोणाला? पुण्यात दोन मतदारसंघात ‘फॅमिली ड्रामा’
-अल्पवयीन आरोपींचं वय किती असावं? अजित पवार करणार शहांकडे मोठी मागणी
-“तो जिंकला पाहिजे” सुरज चव्हाण जिंकण्यासाठी पवार कुटुंबानं केलं बारामतीकरांना आवाहन
-हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! ‘या’ शुभ मुहूर्तावर फुंकणार ‘तुतारी’