पुणे : राज्यभरात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारचं सत्र सुरूच आहे. यामुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. अशातच आता पुण्यातील वानवडी परिसरातील एका शालेय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. शाळेच्या व्हॅन चालकाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. घटनेमुळे शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या घटनेवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
‘या घटने संदर्भात जेव्हा चौकशी करण्यात आली. त्यावेळी असे निदर्शनात आले की, त्या शाळेच्या व्हॅन चालकाला तेथील स्थानिक नेत्यांनीच पळून जायला मदत केली आहे. परंतु आम्ही त्याला कठोर शिक्षा नक्कीच देणार आहे. आरोपी कोणीही असो त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल. मी काही राजकीय पक्ष वैगरे बघत नाही’, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
या घटनेतील आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरु होता त्याचे नाव संजय जेटींग रेड्डी (वय ४५, रा. वैदुवाडी, हडपसर) असून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. पीडित मुलीने तिच्या पालकांनी विश्वासात घेऊन विचारले असता आरोपीने अश्लील कृत्य केल्याचे तिने सांगितले आहे. या घटनेनंतर पुणे शहर चांगलचं हादरलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-वडिलांना की मुलाला उमेदवारी कोणाला? पुण्यात दोन मतदारसंघात ‘फॅमिली ड्रामा’
-अल्पवयीन आरोपींचं वय किती असावं? अजित पवार करणार शहांकडे मोठी मागणी
-“तो जिंकला पाहिजे” सुरज चव्हाण जिंकण्यासाठी पवार कुटुंबानं केलं बारामतीकरांना आवाहन
-हर्षवर्धन पाटलांचं ठरलं! ‘या’ शुभ मुहूर्तावर फुंकणार ‘तुतारी’