पुणे : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीड घडमोडींना वेग आला आहे. महायुतीमध्ये वरिष्ठ पातळीवर जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचे काम सुरु आहे. त्यातही पुण्यातील ८ मतदारसंघांपैकी जास्तीत जास्त मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्यासाठी महायुतीतील मित्रपक्षांमध्ये रस्सीखेच सुरु आहे.
अशातच मंगळवारी पुण्यामध्ये भाजपकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांचा मतदानाच्या माध्यमातून कल जाणून घेण्यात आला. यामध्ये पुण्यातील कोथरूड, पर्वती, शिवाजीनगर आणि खडकवासला ४ या विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदारांनाच पसंती दिल्याचे समोर आले. उमेदवार निवडीसाठी भाजपने बंद लिफाफ्याच्या माध्यमातून प्रत्येक मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांकडून कल जाणून घेतला.
पर्वती मतदारसंघातून सलग तीनदा आमदार झालेल्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांनाच पदाधिकाऱ्यांनी पसंती दिल्याची माहिती आहे. ३ टर्म मिसाळ यांनी मतदारसंघात केलेले काम आणि कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांसोबत राहिलेले संबंध या माधुरी मिसाळ यांच्या जमेच्या बाजू ठरल्या आहेत. त्यामुळेच माधुरी मिसाळ यांनाच पंसती मिळाली असल्याची माहिती एका पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘कही खुशी, कही गम’: भाजपच्या इच्छुकांना टेंशन, दोन मतदारसंघाचा दावा सोडला
-अजितदादांच्या मेळाव्याला आमदारांची दांडी; पक्षांतराच्या चर्चेवर सुनील टिंगरे म्हणाले,….
-‘ये बंधन तो…’ बारामतीत पवार काकी-पुतण्या आले आमने-सामने; पुढे काय घडलं?
-खडकवासल्यात भाजप नेते भिडले; विद्यमान आमदारांनी केली इच्छुकांची बोलती बंद, नेमकं काय प्रकरण?
-पिंपरी-चिंचवड: राष्ट्रवादीतील बंडाचं नेमकं कारण काय? भाजपचंही टेंशन वाढलं