पुणे : येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात जोरदार तयारी सुरु आहे. महाविकास आघाडीतील ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चांगलंच इनकमिंग सुरु आहे. विशेष उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अनेक नेते प्रवेश करत असून आणखी काही नेते, पदाधिकारी तुतारी फुंकण्यासाठी इच्छुक आहेत.
पक्षाला लागलेल्या गळतीवरुन अजित पवारांनी पुण्यात पदाधिकाऱ्यांचा महामेळावा आयोजित केला होता. या मेळाव्याला हजर राहण्याचे आदेश असताना देखील आमदार चेतन तुपे आणि आमदार सुनील टिंगरे या दोघांनी दांडी मारली. त्यामुळे टिंगरे आणि तुपे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आले. यावर आता सुनील टिंगरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा आयोजित केला होता. माझ्या तब्बेतीच्या कारणास्तव मी मेळाव्याला हजर राहू शकलो नाही. यातून कोणताही गैरसमज करुन घेऊ नये. मी अजितदादांसोबत आहे आणि अजितदादांसोबतच राहिल. यामध्ये कोणतंही दुमत नाही, असे म्हणत सुनील टिंगरे यांनी पक्षांतराच्या चर्चेला पुर्णविराम दिला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-‘ये बंधन तो…’ बारामतीत पवार काकी-पुतण्या आले आमने-सामने; पुढे काय घडलं?
-खडकवासल्यात भाजप नेते भिडले; विद्यमान आमदारांनी केली इच्छुकांची बोलती बंद, नेमकं काय प्रकरण?
-पिंपरी-चिंचवड: राष्ट्रवादीतील बंडाचं नेमकं कारण काय? भाजपचंही टेंशन वाढलं
-सुनील तटकरेंना मुंबईहून रायगडला नेणाऱ्या ‘त्या’ हेलिकॉप्टरचा अपघात; तिघांचा मृत्यू
-कसब्यात ‘पोस्टरवॉर’! रासने समर्थक लागले कामाला; ‘तैयार है हम’चा दिला नारा