बारामती | पुणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वात चर्चेत असणारा मतदारसंघ म्हणजे बारामती. लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती आणि पवार कुटुंब हे चांगलेच चर्चेत आले होते. त्यामध्ये एकाच कुटुंबातील २ व्यक्ती आमनेसामने आले होते. त्यानंतर आता येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीतही बारामतीमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना पहायला मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांच्याशी भेट झाली. बारामतीत युगेंद्र आणि सुनेत्रा ‘काकी’ अचानक आमने-सामने आले. यावेळी राजकीय विरोधक असूनही युगेंद्र यांनी नात्याची जाण ठेवत काकींच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतल्याचे पहायला मिळाले.
महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीचे औचित्य साधत सुनेत्रा पवार आणि युगेंद्र पवार यांनी अभिवादन करण्यासाठी पोहचले. नेमके याच वेळी बारामती नगरपालिकेच्या आवारातील शास्त्रींच्या पुतळ्यासमोर दोघेही एकाचवेळी आमने-सामने आले. यावेळी युगेंद्र पवारांनी काकी सुनेत्रा पवार यांच्या पाया पडून नमस्कार करत सुनेत्रा पवार यांचे आशीर्वाद घेतले. युगेंद्र पवारांनी राजकारणाचा कोणताही अडसर न ठेवता काकी सुनेत्रा पवार यांचा आशीर्वाद घेतल्याने राजकीय वर्तुळात याची चांगलीच चर्चा सुरु आहे.
महत्वाच्या बातम्या-
-खडकवासल्यात भाजप नेते भिडले; विद्यमान आमदारांनी केली इच्छुकांची बोलती बंद, नेमकं काय प्रकरण?
-पिंपरी-चिंचवड: राष्ट्रवादीतील बंडाचं नेमकं कारण काय? भाजपचंही टेंशन वाढलं
-सुनील तटकरेंना मुंबईहून रायगडला नेणाऱ्या ‘त्या’ हेलिकॉप्टरचा अपघात; तिघांचा मृत्यू
-कसब्यात ‘पोस्टरवॉर’! रासने समर्थक लागले कामाला; ‘तैयार है हम’चा दिला नारा