पुणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज पुण्यामध्ये भाजपकडून स्थानिक पदाधिकाऱ्यांचा कल जाणून घेण्यात आला. सध्या भाजपकडे असणाऱ्या ६ मतदारसंघांमध्ये पक्ष निरीक्षकांच्या माध्यमातून बंद लिफाफ्यात पदाधिकाऱ्यांकडून पसंतीच्या तीन उमेदवारांची नावे घेण्यात आली. मतदारसंघातील तसेच शहर, प्रदेश आणि केंद्र पातळीवर काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांकडून यावेळी आपली पसंती नोंदवली आहे. हे लिफाफे थेट प्रदेश कार्यालयामध्ये उघडले जाणार आहेत. एका बाजूला ही प्रक्रिया सुरू असताना कसबा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांमध्ये ‘पोस्टरवॉर’ रंगल्याचं दिसत आहे. कसबा निवडणूक प्रमुख हेमंत रासने आणि शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या समर्थकांकडून पोस्टर्स व्हायरल करण्यात आले आहेत.
माजी स्थायी समिती अध्यक्ष असणारे हेमंत रासने यांचा पोटनिवडणुकीमध्ये पराभव झाला होता. मात्र त्यानंतर देखील पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवत निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी सोपवली. त्यांनी मतदारसंघांमध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्याच्या माध्यमातून आपला जनसंपर्क वाढवला आहे. कसब्यामध्ये पक्षीय संघटना मजबूत करण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पराभवाचा वचपा काढत भाजपने जवळपास 15 हजारांचे मताधिक्य मिळवले. आता काँग्रेसकडे गेलेला मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
हेमंत रासने यांच्यासह शहराध्यक्ष धीरज घाटे हे देखील कसब्यातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत. सोबतच दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक, दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या सून स्वरदा बापट देखील इच्छुक आहेत. रासने आणि घाटे यांच्या समर्थकांकडून सध्या सोशल मीडियावर पोस्टर्स व्हायरल केली जात आहेत. यामध्ये ‘आपला नेताच कसब्याचा आमदार होणार’, असा दावा करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात नेमकं चाललंय तरी काय? पोलिसांनी जप्त केला लाखोंचा गुटखा
-भाजपचं ठरलं! ४ मतदारसंघात विद्यमानांना पसंती, पण कॅन्टोन्मेंट अन् कसब्याचं काय?
-काकांचा पुतण्याला आणखी एक मोठा धक्का; विलास लांडेंचं तुतारी फुंकणं फिक्स, कोणी केली घोषणा?
-‘आमचं आयुष्य उद्ध्वस्त करुन ते…’; सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कोणाकडे?
-पुण्यातील गुन्हेगारी रोखण्यासाठी राज्य सरकारचा ‘हा’ मोठा निर्णय